कुंभवली ग्रामपंचायत थेट सरपंचपदी तृप्ती कुंदन संखे तर उपसरपंचपदी अमित संखे यांची निवड !

 कुंभवली ग्रामपंचायत थेट सरपंचपदी तृप्ती कुंदन संखे तर उपसरपंचपदी अमित संखे यांची निवड !

मी सरपंच मानधन न स्वीकारता तो पूर्णपणे गावातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला जाईल : सरपंच तृप्ती संखे 

पालघर : पालघर तालुक्यातील कुंभवली -एकलारे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी गावातील मतदारांनी भरघोस मत देऊन तृप्ती कुंदन संखे यांना निवडून दिलेले आहे तर उपसरपंच पदी अमित परशुराम संखे यांची निवड करण्यात आली.

 दिनांक २८ ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी ४ वाजता गावात कार्यक्रम आयोजीत करुन मतदारांच्या उपस्थित व आशीर्वादाने सरपंच तृप्ती संखे यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारला यावेळी गावातील लोकांनी निवडून आलेल्या उपस्थित सदस्याचा सत्कार करण्यात आला. अश्या निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्याना श्री. कुलस्वामिनी सप्तश्रुंगी माता मंदिर, कुंभवली या तर्फे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या बद्दल अभिनंदन पत्रक ही देण्यात आले.

यावेळी सरपंच तृप्ती संखे यांनी सांगितले की, गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी पाऊले उचलत महिला भवन उभारणार असून गावात वीजेचा वारंवार होणारा लपंडाव पाहता औद्योगिक क्षेत्रातून वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार तर जवळच असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे चोरीचे प्रकार वाढल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी CCTV  कॅमेरे बसविण्यात येणार आहेत तर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्या पाहता विनामूल्य वायफाय कनेक्शनची सुविधा येत्या काही दिवसातच देण्यात येईल, प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद घेता यावा म्हणून क्रिकेट मैदानावर २०० प्रेक्षक बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. कुंभवली ऐकलारे मुरबा या मुख्य रस्त्यावर असलेला कुंभवली प्रवेशद्वाराजवळील अपघाती वळण रस्ता रुंदीकरण करून जंक्शन स्पाॅट तयार करण्यात येईल जेणेकरून भविष्यात अपघात रोखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, तसेच गावातील गरिबी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून मी सरपंच मानधन न स्वीकारता तो पूर्णपणे मानधन त्या विद्यार्थ्यांना दिला जाईल तसेच औद्योगिक क्षेत्राकडून गावापर्यंत येणारा मुख्य रस्ता रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असू.

सदर सरपंच पदग्रहण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी व बाळासाहेबांची शिवसेनेचे कुंदन संखे, नवनिर्वाचित बिनविरोध निवड झालेले उपसरपंच अमित संखे, प्रशासक शिक्षण विस्तार अधिकारी वाघ, ग्रामसेवक राहुल पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजय पिंपळे, माजी उपजिल्हाधिकारी अनंत संखे, पालघर हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर संखे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव संखे, सदस्य आकाश संखे, राहुल संखे, तेजल संखे, अश्विनी पिंपळे, माजी सरपंच व सदस्य सोनाली संखे, सुमती संखे, शाखाप्रमुख सुर्यकांत संखे, ग्रामस्थ माजी सरपंच सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.  



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी