भारताच्या 2 बोटी पाकिस्तानच्या ताब्यात; अटक केलेल्या 16 खलाशांमध्ये 7 जण पालघरमधील
भारताच्या 2 बोटी पाकिस्तानच्या ताब्यात; अटक केलेल्या 16 खलाशांमध्ये 7 जण पालघरमधील
पालघर :गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या 2 बोटी आणि त्यावरील 16 खलाश्यांना पाकिस्तान सैनिकांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे
खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवरील एकूण 16 जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. यामधील 7 जण पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरातमधील ओखा आणि पोरबंदर या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातून या भागांत रोजगारासाठी जातात .गुजरात मधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक बोट मासेमारी साठी गेली असता याच भागातील दोन बोटी भरकटल्यानं पाकिस्तान हद्दीत गेल्या आहे. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार असल्याची माहिती मिळत आहे.यामध्ये पाकिस्तान मधील मेरिटाईम सेक्युरिटी एजन्सी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं असून पाकिस्तान इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस एन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी ही माहिती दिली आहे .
Comments
Post a Comment