Posts

वाढवणमध्ये बनावट कागदपत्रांनी जमीन हडपली; पाच जणांवर गुन्हा दाखल

Image
वाढवणमध्ये बनावट कागदपत्रांनी जमीन हडपली; पाच जणांवर गुन्हा दाखल  पालघर : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील जमिनींचे भाव वाढले असून जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाढवणजवळील आंबिष्टेवाडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबिष्टेवाडी येथील बारकू महाद्या भंडारी यांच्या नावावर गट क्रमांक ८०/५ मधील १.०१.०० हेक्टर जमीन होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुली वेणूबाई बाबुराव पाटील आणि कुटुंबीय या जमिनीचा ताबा घेऊन गेल्या ४० वर्षांपासून शेती करत आहेत. मात्र राजेंद्र दशरथ राऊत आणि रोहित दत्तात्रय राऊत यांनी त्याच नावाच्या इतर व्यक्तीच्या माहितीचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे महसूल विभागाच्या नोंदीमध्ये बदल करून जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हर्षद बाबुराव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोईसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सखोल चौकशी करून ...

बोईसर औद्योगिक क्षेत्रात भीषण दुर्घटना – टेम्पो चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Image
बोईसर औद्योगिक क्षेत्रात भीषण दुर्घटना – टेम्पो चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू बोईसर : बोईसर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जे-१०२ जवळ वर्धमान रेमिडाईज कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोचा फालका विद्युत रोहत्रीच्या संपर्कात आल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे १ वाजता घडली. विकी कमलेश सिंग (वय ३३) असे मृत चालकाचे नाव आहे. तो कारखान्यात माल भरण्याची तयारी करत असताना ही दुर्घटना घडली. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने टीमा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या टेम्पोचा संबंध प्लॉट क्र. जे-१०८ येथे सुरू असलेल्या 'सनवेज लॉजिस्टिक' या ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी असल्याचे समोर आले आहे. या परिसरात अनेक व्यवसाय परवानगीशिवाय सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मजूर व वाहनचालक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि नियमबाह्य व्य...

बोईसर वाहतूक कोंडीवर निर्णायक पावले – प्रशासनाकडून उपाययोजनांना गती

Image
बोईसर वाहतूक कोंडीवर निर्णायक पावले – प्रशासनाकडून उपाययोजनांना गती बोईसर – बोईसर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन अधिक गंभीर झाले असून, उपाययोजनांच्या अंमलबजावणीत गती आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखा प्रभारी सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, बोईसर सरपंच दिलीप धोडी, सालवड सरपंच संजय पाटील, बोईसर उपसरपंच निलम संखे, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, रिक्षा-टॅक्सी संघटना, एमआयडीसी अभियंते, बसस्थानक प्रतिनिधी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या बैठकीत ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या मागील चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणी आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बोईसर ग्रामपंचायतीने उघड्या गटारी बंद करून पदपथ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम निधीच्या मर्यादेत होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास अधिक लाभ होईल, असे उपसरपंच निलम संखे यांनी स्पष्ट केले. बैठकीत रुग्णालये आणि शाळा ...

मनोरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांचा धडाकेबाज सापळा, सात दरोडेखोर थेट कोठडीत

Image
मनोरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांचा धडाकेबाज सापळा, सात दरोडेखोर थेट कोठडीत पालघर – मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नानीवली गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल सात आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली असून, आरोपींनी याआधीही गुन्हा केल्याचे समोर आले आहे. दि. १३ जुलै २०२५ रोजी रात्री २.४० वाजता प्रसाद विजय पाटील (वय २८, रा. नानीवली, ता. पालघर) यांच्या घरी काही अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तोंडाला रूमाल बांधले होते, तसेच त्यांच्या हातात लोखंडी रॉड, चिकटपट्टी सेल आणि अग्निशस्त्र होते. मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असताना घरमालकाला जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपी घाबरून पळून गेले. या घटनेनंतर पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.नं. २११/२०२५ कलम भादंवि ३३१(४), ६२, ३१०(४)(५), ३१२ सह हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्...

यशवंत सृष्टि मुख्य रस्त्यावर जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग

Image
यशवंत सृष्टि मुख्य रस्त्यावर जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग भाजप उपाध्यक्ष प्रशांत संखे यांची तातडीने कारवाईची मागणी बोईसर – बोईसर शहरातील यशवंत सृष्टी वसाहतीतील मुख्य रस्त्यावर टेम्पो, ट्रक, शालेय बसेस यांसारख्या जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत आत्माराम संखे यांनी वाहतूक विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. यशवंत सृष्टि भागात मोठ्या प्रमाणावर जड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून, शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक तसेच सामान्य नागरिक यांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अपघाताची शक्यता देखील वाढली असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशांत संखे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना निवेदन सादर करत सदर वाहने हटवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. “या बेकायदेशीर पार्किंगमुळे रहिवाशांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आह...

बोईसरमध्ये PEDESTA Foundation तर्फे PDTS मैदानात वृक्षारोपण सोहळा पार पडला

Image
बोईसरमध्ये PEDESTA Foundation तर्फे PDTS मैदानात वृक्षारोपण सोहळा पार पडला बोईसर – पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक संस्थांकडून राबवले जाणारे उपक्रम ही काळाची गरज बनली आहे. त्याच दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत, बोईसरमधील PEDESTA Local Fitness Foundation या संस्थेच्या वतीने आज, रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी PDTS मैदानात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बिपीन पाटील आणि डॉ. महेश भानुशाली यांची उपस्थिती लाभली. यासोबतच संस्थेचे अध्यक्ष विनोद पिंपळे , सचिव दिलीप पिंपळे , खजिनदार  किशोर महाले , तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य  उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मैदान परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. सहभागी सदस्यांनी स्वतः झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. उपस्थितांनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्पही केला. या उपक्रमाविषयी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विनोद पिंपळे म्हणाले, "Fitness म्हणजे केवळ शरीराची तंदुरुस्ती नव्हे, तर निसर्ग आणि समाजप्रती जबाबदारीही आमच्या संस्थेचा भाग आहे. आजच्या वृक्षारोपण उपक्रमातून आम्ही ‘हि...

मोखाडा पोलीसांची मोठी कामगिरी : साडेचार लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक

Image
मोखाडा पोलीसांची मोठी कामगिरी : साडेचार लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक   पालघर जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात कारवाईला वेग पालघर – जिल्ह्यात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मोखाडा पोलीस ठाण्याने गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत सुमारे ४.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दिं. १० जुलै २०२५ रोजी मोखाडा पोलीसांना नाशिकहून जव्हारकडे जाणाऱ्या एका टाटा इंट्रा गाडीतून (MH-48-CQ-3034) गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पवारपाडा गावाच्या हद्दीत नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी करत असताना संशयित गाडी थांबवण्यात आली. चालक मुजिब अजगर मनियार (वय ४८, रा. मेन रोड, मोखाडा) याने गाडीमध्ये कुरकुरे, गाद्या व पडदे असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली असता २,३४,२००/- रु...