बोईसर औद्योगिक क्षेत्रात भीषण दुर्घटना – टेम्पो चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बोईसर औद्योगिक क्षेत्रात भीषण दुर्घटना – टेम्पो चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बोईसर : बोईसर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जे-१०२ जवळ वर्धमान रेमिडाईज कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोचा फालका विद्युत रोहत्रीच्या संपर्कात आल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे १ वाजता घडली.

विकी कमलेश सिंग (वय ३३) असे मृत चालकाचे नाव आहे. तो कारखान्यात माल भरण्याची तयारी करत असताना ही दुर्घटना घडली. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने टीमा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, या टेम्पोचा संबंध प्लॉट क्र. जे-१०८ येथे सुरू असलेल्या 'सनवेज लॉजिस्टिक' या ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी असल्याचे समोर आले आहे. या परिसरात अनेक व्यवसाय परवानगीशिवाय सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मजूर व वाहनचालक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि नियमबाह्य व्यवसायांच्या धोक्याचे उदाहरण ठरत आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक