यशवंत सृष्टि मुख्य रस्त्यावर जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग
यशवंत सृष्टि मुख्य रस्त्यावर जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग
भाजप उपाध्यक्ष प्रशांत संखे यांची तातडीने कारवाईची मागणी
बोईसर – बोईसर शहरातील यशवंत सृष्टी वसाहतीतील मुख्य रस्त्यावर टेम्पो, ट्रक, शालेय बसेस यांसारख्या जड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत आत्माराम संखे यांनी वाहतूक विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
यशवंत सृष्टि भागात मोठ्या प्रमाणावर जड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून, शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक तसेच सामान्य नागरिक यांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अपघाताची शक्यता देखील वाढली असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशांत संखे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना निवेदन सादर करत सदर वाहने हटवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. “या बेकायदेशीर पार्किंगमुळे रहिवाशांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून जनतेला दिलासा द्यावा,” असे ते म्हणाले.
स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडूनही होत आहे.
Comments
Post a Comment