Posts

बोईसरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची कारभारशैली चर्चेत

Image
बोईसरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची कारभारशैली चर्चेत सार्वजनिक बांधकाम भूखंडावर फेरिवाल्यांचा कब्जा – संरक्षण भिंतीसाठी खर्चलेले २३.६० लाख वाया? बोईसर – बोईसर तारापूर मुख्य रस्त्याकडे जाताना जमुना टॉकीज मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा एक भूखंड असून, या भूखंडावर सुमारे २३.६० लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत आणि लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले होते . मात्र, सध्या या भूखंडाचा वापर स्थानिक फेरिवाले करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खर्चाचा उपयोग झाला की वाया गेला, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. स्थानिकांच्या सांगण्यानुसार पूर्वी या जागेवर तळीराम व फेरिवाले अनधिकृतपणे अतिक्रमण करत होते . त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या जागेच्या चारही बाजूंनी संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार उभारले होते . परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे सध्या या प्रवेशद्वाराच्या चाव्या फेरिवाल्यांकडेच असल्याचे उघड झाले असून, त्यांचा जागेवर मालसामान ठेवण्यासह फळ विक्रीसाठी वापर सुरू आहे . या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे – या जागेचा उपयोग करण्यासाठी कोणताही भाडे करार करण्यात आला आहे का? जर...

पालघरचा अभिमान! रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार"

Image
पालघरचा अभिमान! रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" पालघर : पालघर जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी नेमबाजी (शूटिंग) या क्रीडा प्रकारात अपूर्व यश संपादन करत महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" पटकावला आहे. हा पुरस्कार पुणे येथे पार पडलेल्या भव्य समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रुद्रांक्षच्या वतीने त्यांचे वडील, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. रुद्रांक्षने अत्यंत कठोर परिश्रम, चिकाटी आणि अचूकतेच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत आपल्या कौशल्याची छाप सोडली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने त्याला या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवले आहे. हा पुरस्कार केवळ रुद्रांक्षचाच नाही तर पालघर जिल्ह्यासाठीही मोठा अभिमान आहे. त्याच्या या यशामुळे जिल्...

बोईसर ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभार उघड: बंद घराला लाखांची पाणीपट्टी

Image
बोईसर ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभार उघड: बंद घराला लाखांची पाणीपट्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुतारपाडा येथील एका बंद घरावर तब्बल दोन लाख रुपयांची पाणीपट्टी आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रवींद्र संखे या ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीतील हे घर सन २००० पासून बंद असून, कोणतीही व्यक्ती तेथे राहत नाही. तरीही बोईसर ग्रामपंचायतीने या घरावर एक लाख ९२ हजार रुपयांचे पाणीपट्टीचे बिल पाठवले. विशेष म्हणजे रवींद्र संखे यांनी पाणीपुरवठा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज केला होता आणि त्यानंतर तो पुरवठा बंदही करण्यात आला होता. या प्रकाराची तक्रार त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. रवींद्र संखे यांनी ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्यावर आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करत माहिती अधिकाराअंतर्गत कागदपत्रांची मागणी केली असता, ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे २८,८०० कागदपत्रांच्या प्रतींसाठी तब्बल १,१५,२०० रुपये भरावे लागतील, असा लेखी...

बोईसरमध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरी

Image
बोईसरमध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरी बोईसर – ओम साई नवरंग मिन्न मंडळ (रजि.) व राजर्षी शाहू संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांची संयुक्त जयंती मंगळवार, दिनांक २० एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ, धोडीपुजा, नवापूर रोड, बोईसर येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या कार्यक्रमात विविध थोर महापुरुषांच्या कार्याची आठवण काढत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. या संयुक्त जयंती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर विभूतींना अभिवादन करण्यात येईल. त्यांनी समाजप्रबोधन, स्वातंत्र्य संग्राम, शिक्षण आणि समतेसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. हा महोत्सव नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता होणार असून, त्यानंतर रात्री ८.०० वाजता ‘ऑर्केस्ट्रा ऑल टाईम हिट्स (मुंबई)’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हिंदी व मराठ...

फोनवर बोलत असताना सासऱ्याचा सुनेवर लाकडी दांडक्याने हल्ला

Image
फोनवर बोलत असताना सासऱ्याचा सुनेवर लाकडी दांडक्याने हल्ला   डहाणू : तालुक्यातील वामणगाव कयटेपाडा येथे एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने घराच्या अंगणात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविका मनोज शनवार (वय ३२, व्यवसाय – मजुरी, रा. धामणगाव, कवतेपाडा) या आपल्या राहत्या घराबाहेरील अंगणात कपडे वाळत घालत असताना पतीसोबत फोनवर बोलत होत्या. याचवेळी त्यांचे सासरे दत्तू दामा शनवार (रा. धागणगाव, कवठेनाडा, व्यवसाय – शेती) हे अचानक पाठीमागून आले. "तू फोनवर कोणाशी बोलतेस?" असे विचारत त्यांनी भाविका यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. संशयाच्या भरात त्यांनी सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत लाकडी दांडक्याने त्यांच्या कंबरेवर व डोक्यावर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात भाविका यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविका शनवार यांनी डहाणू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ...

बोईसर गुटखामुक्त की गुटखाग्रस्त? – अमनच्या टोळीचं उघडं कारस्थान

Image
बोईसर गुटखामुक्त की गुटखाग्रस्त? – अमनच्या टोळीचं उघडं कारस्थान बोईसर : राज्य सरकारने गुटख्यावर घातलेली बंदी केवळ कागदावरच उरली असून, बोईसर शहरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. 'दमण पॅटर्न'च्या धर्तीवर अमन नावाच्या गुटखा माफियाने संपूर्ण शहरात आपले जाळे पसरवले आहे. किराणा दुकानांच्या आडून, तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमधून सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. गुजरातहून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करून तो बोईसरमध्ये आणला जातो आणि इथे डबल-तिब्बट दराने विकला जात आहे. मुख्य रस्त्यांपासून ते औद्योगिक क्षेत्र आणि बाजारपेठांपर्यंत, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन टपऱ्या उभ्या राहत असून, स्थानिक तरुणांना या व्यसनाच्या विळख्यात ओढलं जात आहे. या अवैध व्यवहारात चौरसिया, सोनू खान, तिवारी यांसारख्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग असून, स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली गेली असली तरी, अमनसारख्या माफियांनी नव्या स्वरूपात गुटख्याचा पुरवठा सुरूच ठेवला आहे. गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, पचनाच्या समस्...

परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे चिल्हार-बोईसर मार्ग धोकादायक; वाघोबा खिंडीत अपघातांचा धोका वाढला

Image
परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे चिल्हार-बोईसर मार्ग धोकादायक ; वाघोबा खिंडीत अपघातांचा धोका वाढला बोईसर : चिल्हार-बोईसर मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावर लोलोंडे, नागझरी, गुंदले परिसरात कार्यरत असलेल्या स्टोन क्रशर आणि RMC प्लांट्समधून होणाऱ्या गौणखनिजांची वाहतूक ही अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. उघड्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांमधून दगड, खडी व ग्रिट पावडर भरलेली असून ती रस्त्यावर सांडली जात आहे. यामुळे वाघोबा खिंडीसारख्या अरुंद आणि वळणदार भागांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिकांनी अनेक वेळा प्रादेशिक परिवहन विभागाकडे लेखी तक्रारी केल्या असूनदेखील, या वाहनांवर कुठलाही बंदोबस्त अथवा कठोर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी, वाहन चालक बिनधास्तपणे ओव्हरलोडिंग करत आहेत, जे रस्त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. या मार्गावरील अपघातांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात परिवहन विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशास...