बोईसर ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभार उघड: बंद घराला लाखांची पाणीपट्टी

बोईसर ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभार उघड: बंद घराला लाखांची पाणीपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा



बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुतारपाडा येथील एका बंद घरावर तब्बल दोन लाख रुपयांची पाणीपट्टी आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रवींद्र संखे या ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीतील हे घर सन २००० पासून बंद असून, कोणतीही व्यक्ती तेथे राहत नाही.


तरीही बोईसर ग्रामपंचायतीने या घरावर एक लाख ९२ हजार रुपयांचे पाणीपट्टीचे बिल पाठवले. विशेष म्हणजे रवींद्र संखे यांनी पाणीपुरवठा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज केला होता आणि त्यानंतर तो पुरवठा बंदही करण्यात आला होता. या प्रकाराची तक्रार त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.


रवींद्र संखे यांनी ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्यावर आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करत माहिती अधिकाराअंतर्गत कागदपत्रांची मागणी केली असता, ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे २८,८०० कागदपत्रांच्या प्रतींसाठी तब्बल १,१५,२०० रुपये भरावे लागतील, असा लेखी आदेश दिला. यावर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर, केवळ ३५ पानांची माहिती देण्याचे आदेश जारी करण्यात आले.


याप्रकरणात कमलेश संखे यांच्या कामकाजावर आधीपासूनच अनेक तक्रारी आहेत. नमुना ८, ९ आणि घरपट्टी मालमत्ता रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, संगणक प्रणालीचा गैरवापर करून बिल्डरांच्या फायद्यासाठी फेरबदल करणे, भ्रष्टाचार वाढवणे अशा गंभीर आरोपांना त्यांनी सामोरे जावे लागले आहे. पूर्वी वसई येथे बदली करण्यात आलेल्या संखे यांची पुन्हा बोईसरमध्ये नेमणूक झाल्याने, जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांच्या संगनमताचा आरोपही केला जात आहे.


या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पालघर जिल्हा यांच्यातर्फे बोईसर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पालघर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक