परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे चिल्हार-बोईसर मार्ग धोकादायक; वाघोबा खिंडीत अपघातांचा धोका वाढला
परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे चिल्हार-बोईसर मार्ग धोकादायक; वाघोबा खिंडीत अपघातांचा धोका वाढला
बोईसर : चिल्हार-बोईसर मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावर लोलोंडे, नागझरी, गुंदले परिसरात कार्यरत असलेल्या स्टोन क्रशर आणि RMC प्लांट्समधून होणाऱ्या गौणखनिजांची वाहतूक ही अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.
उघड्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांमधून दगड, खडी व ग्रिट पावडर भरलेली असून ती रस्त्यावर सांडली जात आहे. यामुळे वाघोबा खिंडीसारख्या अरुंद आणि वळणदार भागांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा प्रादेशिक परिवहन विभागाकडे लेखी तक्रारी केल्या असूनदेखील, या वाहनांवर कुठलाही बंदोबस्त अथवा कठोर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी, वाहन चालक बिनधास्तपणे ओव्हरलोडिंग करत आहेत, जे रस्त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
या मार्गावरील अपघातांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात परिवहन विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाने तातडीने पुढाकार घेऊन संबंधित क्रशर मालकांवर कारवाई करावी, तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर कडक निर्बंध लावावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment