बोईसरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची कारभारशैली चर्चेत

बोईसरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची कारभारशैली चर्चेत

सार्वजनिक बांधकाम भूखंडावर फेरिवाल्यांचा कब्जा – संरक्षण भिंतीसाठी खर्चलेले २३.६० लाख वाया?



बोईसर – बोईसर तारापूर मुख्य रस्त्याकडे जाताना जमुना टॉकीज मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा एक भूखंड असून, या भूखंडावर सुमारे २३.६० लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत आणि लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. मात्र, सध्या या भूखंडाचा वापर स्थानिक फेरिवाले करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खर्चाचा उपयोग झाला की वाया गेला, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.


स्थानिकांच्या सांगण्यानुसार पूर्वी या जागेवर तळीराम व फेरिवाले अनधिकृतपणे अतिक्रमण करत होते. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या जागेच्या चारही बाजूंनी संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार उभारले होते. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे सध्या या प्रवेशद्वाराच्या चाव्या फेरिवाल्यांकडेच असल्याचे उघड झाले असून, त्यांचा जागेवर मालसामान ठेवण्यासह फळ विक्रीसाठी वापर सुरू आहे.


या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे – या जागेचा उपयोग करण्यासाठी कोणताही भाडे करार करण्यात आला आहे का? जर नाही, तर सार्वजनिक मालमत्तेचा असा अनधिकृत वापर कसा सुरू आहे? यामागे सार्वजनिक बांधकाम विभागातील कोणत्या अधिकाऱ्याचा सहभाग आहे? असा प्रश्न आता उभा राहतो आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, कोणीतरी अधिकारी या व्यवहारातून स्वतःचा स्वार्थ साधत आहे.


या प्रकरणाची तपासणी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये आणि सरकारी मालमत्तेचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक