फोनवर बोलत असताना सासऱ्याचा सुनेवर लाकडी दांडक्याने हल्ला

फोनवर बोलत असताना सासऱ्याचा सुनेवर लाकडी दांडक्याने हल्ला 

डहाणू : तालुक्यातील वामणगाव कयटेपाडा येथे एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने घराच्या अंगणात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविका मनोज शनवार (वय ३२, व्यवसाय – मजुरी, रा. धामणगाव, कवतेपाडा) या आपल्या राहत्या घराबाहेरील अंगणात कपडे वाळत घालत असताना पतीसोबत फोनवर बोलत होत्या. याचवेळी त्यांचे सासरे दत्तू दामा शनवार (रा. धागणगाव, कवठेनाडा, व्यवसाय – शेती) हे अचानक पाठीमागून आले. "तू फोनवर कोणाशी बोलतेस?" असे विचारत त्यांनी भाविका यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.


संशयाच्या भरात त्यांनी सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत लाकडी दांडक्याने त्यांच्या कंबरेवर व डोक्यावर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात भाविका यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


भाविका शनवार यांनी डहाणू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा क्रमांक १५०/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, पुढील कारवाई सुरू आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक