पालघरचा अभिमान! रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार"
पालघरचा अभिमान! रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार"
पालघर : पालघर जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी नेमबाजी (शूटिंग) या क्रीडा प्रकारात अपूर्व यश संपादन करत महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" पटकावला आहे.
हा पुरस्कार पुणे येथे पार पडलेल्या भव्य समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रुद्रांक्षच्या वतीने त्यांचे वडील, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला.
रुद्रांक्षने अत्यंत कठोर परिश्रम, चिकाटी आणि अचूकतेच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत आपल्या कौशल्याची छाप सोडली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने त्याला या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवले आहे.
हा पुरस्कार केवळ रुद्रांक्षचाच नाही तर पालघर जिल्ह्यासाठीही मोठा अभिमान आहे. त्याच्या या यशामुळे जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा मिळेल, तसेच पालक व खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण होईल.
पालघर जिल्ह्यातून राज्य क्रीडा क्षेत्रात झळकलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. रुद्रांक्षला मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment