Posts

जनसंवाद अभियान अंर्तगत जिल्हा वाहतुक शाखेमार्फत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम” कार्यक्रमाचे आयोजन

Image
जनसंवाद अभियान अंर्तगत जिल्हा वाहतुक शाखेमार्फत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम” कार्यक्रमाचे आयोजन पालघर : बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन नव्याने सुरु झालेल्या वाहतुक शाखे मार्फत वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रात देखील ही संख्या सुमारे १४,८०० इतकी आहे. महाराष्ट्रात घडणा-या रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता संपुर्ण भारतामध्ये रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो ही बाब गंभीर असुन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय यांनी २०२५ पर्यंत रस्ते अपघातामध्ये मृत्युचे प्रमाण ५० टक्के पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने दिनांक ३१जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, मनोर रोड पालघर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक नियमांची जनजागृती व्हावी यासाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंर्तगत "रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम" हा कार्यक्रम आयोजित करुन महाविद्या...

लाडकी बहिण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद' विरोधी कायदा करा - हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

Image
लाडकी बहिण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद' विरोधी  कायदा करा  - हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !   मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. *‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ ३० जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पु...

संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा - हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

Image
संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा - हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी मुंबई : तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. खरे तर मानव यांनी खोटे लिखाण केले, म्हणून त्यांना न्यायालयाने शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला होता. तसेच ते सातत्याने वारकरी संप्रदायातील साधूसंतांवर जातीयवादी भाषेत टीका करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत असतात. त्यामुळे या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाध्ये यांच्या न्यायालयाने प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०’च्या कलम ...

ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी कु. कोमल भूषण पाटील हिची निवड

Image
ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी कु. कोमल भूषण पाटील हिची  निवड पालघर : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणाऱ्या संघात पालघर जिल्ह्यातील पथराळी गावातील कु. कोमल भूषण पाटील हिची  निवड झाली आहे. खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रीडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न प्रत्येत खेळाडू पाहतो. आता पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलै रोजी पार पडला. पण त्याआधी २४ जुलैपासून आधीच वेगवेगळ्या खेळांच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारता कडून ७० पुरुष आणि ४७ महिला असे  एकूण ११७ खेळाडू सहभागी होणार आहे. एकूण १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे खेळाडू १६ क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत.   यात कु. कोमल भूषण पाटील हिने आपल्या अंधत्वावर मात करून पद्मश्री पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे  यांच्याकड...

वाढवण’ बंदराविरोधात पालघर हुतात्मा चौकात तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण

Image
वाढवण’ बंदराविरोधात पालघर हुतात्मा चौकात तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण पालघर : वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने विनाशकारी वाढवण बंदर कायमचे रद्द करण्याच्या मांगणी साठी पालघर हुतात्मा चौकात २४,२५ व २६ जुलै असे तीन दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असुन वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती बरोबर वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मध्य. मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा समाज संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, अखिल महाराष्ट्र कृती समिती, समुद्र बचाव संघ, सागर कन्या या विविध संघटनानी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, डहाणू तालुक्यातील वाढवण गावच्या पर्यावर्णीय दृष्ट्या अती संवेदन विभागातील समुद्रात केंद्र सरकार व राज्य सरकार जेएनपीएच्या माध्यमातून महाकाय वाढवण बंदर प्रकल्प उभारु पहात आहे. या बंदर प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून यामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, डायमेकर्स पार उध्वस्त होणार आहेत. शिवाय येथील नैसर्गिक जैव विविधता , नैसर्गीक समृद्धी प्रवाह, मत्स्य बीजोत्पादन क्षेत्र, ...

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात झाला संपन्न

Image
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात झाला संपन्न रामराज्यासाठी साधना करण्यासह भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा  - बळवंत पाठक मुंबई - व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. आपले विचार आणि वर्तन हे हिंदु संस्कृतीला पूरक असायला हवे. ‘हॅलो’ नाही, तर नमस्कार किंवा ‘राम-राम’ म्हणणे, ही आपली संस्कृती आहे; ‘टीव्ही’वरच्या मालिका पहाणे नाही, तर ‘कीर्तन-भजन’ पहाणे, ही आपली संस्कृती आहे; कुठला अभिनेता नाही, तर राम-कृष्ण हे आपल्या संस्कृतीने दिलेले आदर्श आहेत. आपल्या वागण्या-बोलण्यातून, आचारातून आपण संस्कृतीची जोपासना करूया. धर्माचे पालन करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक बळवंत पाठक यांनी केले. वसई (प.) येथील विश्वकर्मा सभागृह या ठिकाणी झालेल्या गुरुपौर...

पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासनमान्य शाळेत घेण्याचे शिक्षण विभागाचे आव्हान

Image
पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासनमान्य शाळेत घेण्याचे शिक्षण विभागाचे आव्हान पालघर : पालघर प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली असून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजाराप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटिस बजावण्यात आली होती, त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आल्या तर काही शाळांनी पुनःश्च शाळा सुरू न करण्याचे हमीपत्र सादर केले. अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. काही शाळा बंद करण्यात आल्या हे खरे असले तरी सदर शाळा संस्थेमार्फत पुन्हा सुरू करण्याच्या शक्यता आहे त्यामुळे पालकांनी या सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये. तरी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना या अनधिकृत शाळांना बळी न पडता शासनमान्य शाळेतच प्रवेश घ्यावा, असे  असे आवाह...