पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासनमान्य शाळेत घेण्याचे शिक्षण विभागाचे आव्हान

पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासनमान्य शाळेत घेण्याचे शिक्षण विभागाचे आव्हान

पालघर : पालघर प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली असून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजाराप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटिस बजावण्यात आली होती, त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आल्या तर काही शाळांनी पुनःश्च शाळा सुरू न करण्याचे हमीपत्र सादर केले. अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. काही शाळा बंद करण्यात आल्या हे खरे असले तरी सदर शाळा संस्थेमार्फत पुन्हा सुरू करण्याच्या शक्यता आहे त्यामुळे पालकांनी या सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये. तरी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना या अनधिकृत शाळांना बळी न पडता शासनमान्य शाळेतच प्रवेश घ्यावा, असे  असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, आणि शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले आहे.

प्राथमिक विभागाच्या वसई आणि पालघर तालुक्यातील 37 अनधिकृत शाळांवर कारवाई केली असून माध्यमिक विभागाच्या वसई मधील 24  शाळांवर कारवाई केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यात येऊ नये अशा सूचना शिक्षण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी