जनसंवाद अभियान अंर्तगत जिल्हा वाहतुक शाखेमार्फत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम” कार्यक्रमाचे आयोजन
जनसंवाद अभियान अंर्तगत जिल्हा वाहतुक शाखेमार्फत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम” कार्यक्रमाचे आयोजन
पालघर : बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन नव्याने सुरु झालेल्या वाहतुक शाखे मार्फत वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रात देखील ही संख्या सुमारे १४,८०० इतकी आहे. महाराष्ट्रात घडणा-या रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता संपुर्ण भारतामध्ये रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो ही बाब गंभीर असुन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय यांनी २०२५ पर्यंत रस्ते अपघातामध्ये मृत्युचे प्रमाण ५० टक्के पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
त्याअनुषंगाने दिनांक ३१जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, मनोर रोड पालघर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक नियमांची जनजागृती व्हावी यासाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंर्तगत "रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम" हा कार्यक्रम आयोजित करुन महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीना पालघर जिल्हा वाहतुक शाखा तर्फे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे हस्ते एकुण १०० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येऊन वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर व इतर सर्व अधिकारी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, सर्व स्टाफ व उपस्थितांना वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन करुन सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे याबाबत जनजागृती केली. त्याचबरोबर सायबर क्राईम, अंमली पदार्थ, व्यसनाधिनता, महिला विषयक गुन्हे, याबाबत माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर अभिजीत धारशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा पालघर, संदीप नागरे, पोलीस उप निरीक्षक, जिल्हा वाहतुक शाखा पालघर, तसेच सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, मनोर रोड पालघर येथील महाविद्यालयाचे चेअरमेन अल्बर्ड डिसोजा, तसेच प्राचार्य/प्राध्यापक महाविद्यालयातील एकुण ३०० विद्यार्थी / विद्यार्थिनी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment