ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी कु. कोमल भूषण पाटील हिची निवड

ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी कु. कोमल भूषण पाटील हिची  निवड


पालघर : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणाऱ्या संघात पालघर जिल्ह्यातील पथराळी गावातील कु. कोमल भूषण पाटील हिची  निवड झाली आहे.

खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रीडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न प्रत्येत खेळाडू पाहतो. आता पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलै रोजी पार पडला. पण त्याआधी २४ जुलैपासून आधीच वेगवेगळ्या खेळांच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारता कडून ७० पुरुष आणि ४७ महिला असे  एकूण ११७ खेळाडू सहभागी होणार आहे. एकूण १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे खेळाडू १६ क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. 


 यात कु. कोमल भूषण पाटील हिने आपल्या अंधत्वावर मात करून पद्मश्री पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे  यांच्याकडे मल्लखांब या खेळात सातत्याने प्रशिक्षण घेऊन मलखांब व रोप मल्लखांबा वरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्याचे कौशल्य संपादन केले.  त्यासाठी तिच्या आई वडिलांचे मोलाचे योगदान होते. या सर्व बाबी विचारात घेऊन "श्रमप्रतिष्ठान" संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पिंपळे व पाम कुंभवली विभाग हायस्कूलचे मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक समीर पिंपळे यांनी कोमल व तिच्या पालकांचे स्वागत व सत्कार केले व कोमलला पुढील मल्लखांब खेळ कौशल्य विकासासाठी शुभेच्छा दिल्या.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी