हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात झाला संपन्न

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात झाला संपन्न

रामराज्यासाठी साधना करण्यासह भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा  - बळवंत पाठक


मुंबई - व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. आपले विचार आणि वर्तन हे हिंदु संस्कृतीला पूरक असायला हवे. ‘हॅलो’ नाही, तर नमस्कार किंवा ‘राम-राम’ म्हणणे, ही आपली संस्कृती आहे; ‘टीव्ही’वरच्या मालिका पहाणे नाही, तर ‘कीर्तन-भजन’ पहाणे, ही आपली संस्कृती आहे; कुठला अभिनेता नाही, तर राम-कृष्ण हे आपल्या संस्कृतीने दिलेले आदर्श आहेत. आपल्या वागण्या-बोलण्यातून, आचारातून आपण संस्कृतीची जोपासना करूया. धर्माचे पालन करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक बळवंत पाठक यांनी केले. वसई (प.) येथील विश्वकर्मा सभागृह या ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मेधे (वसई) येथील ‘परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनीही गुरूंचे महत्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. वसईसह मुंबईमध्ये भांडुप तसेच देशभरात ७१ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


भांडुप येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता डॉ. निलेश पावस्कर म्हणाले की 'जीवनात जोपर्यंत गुरु येत नाहीत तोपर्यंत जीवनाला दिशा मिळत नाही. हिंदू धर्माने सांगितलेल्या मार्गाने आचरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. मोक्षप्राप्तीसाठी भगवंताशी भेट घालून देण्याचे कार्य केवळ गुरूच करू शकतात यासाठी गुरूंची जीवनात नितांत आवश्यकता असते. गुरूंची तुलना अन्य कशाशीच होऊ शकत नाही.' महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली.


ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’: देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कन्नड आणि बंगाली भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न झाले. या माध्यमांतून देशविदेशातील भाविकांनी ही ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी