लाडकी बहिण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद' विरोधी कायदा करा - हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी
लाडकी बहिण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद' विरोधी कायदा करा - हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी
उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. *‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ ३० जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली.
उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात वज्र दल, मनसे, मानव सेवा प्रतिष्ठान, श्रीराम मित्र मंडळ (धारावी), हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह महिला, युवती आणि धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे काही षड्यंत्र तर नाही ना !, ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे, अशी मागणीही या आंदोलनात मागणी करण्यात आली. उरण-पनवेल मार्गावरील एन्.आय. हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे हीचे उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळील अज्ञातस्थळी तिचे स्तन कापून, तिच्या गुप्तांगावर वार केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे ‘श्रद्धा वालकर प्रकरणा’ची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे. नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डायघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतांनाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि हिंदू युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. ही केवळ पहिली घटना नसून ‘श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, सोनम शुक्ला’ या अनेक हिंदू मुलींना लक्ष करण्यात आलेले आहे. हिंदू महिलांसह जनतेमध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाविषयी रोष व्यक्त होत असून अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार कधी ठोस पाऊले उचलणार, असा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित केला.
राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमिया स्कॉड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात, तसेच या प्रकरणांत काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढावीत. त्यांच्यावरही तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.
Comments
Post a Comment