Posts

टेंभी गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन

Image
टेंभी गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन बोईसर : टेंभी गावात प्रेम नगर रस्त्याचे भूमिपूजन व पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचे 28 फेब्रुवारी बुधवार रोजी पंचायत समिति पालघर उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते नारळ फोडून विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. पालघर तालुक्यातील टेंभी गावात १५ वित्त आयोग फंडातुन पंचायत समिती पालघर चे उपसभापती मिलिंद वडे यांच्या विशेष प्रयत्नातून टेंभी गावातील प्रेम नगर या रस्त्याचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात टेंभी गावचे सरपंच सरोज वडे , उपसरपंच  रूपाली संखे , सदस्य रोहित वडे, संजय वडे, निकिता वडे, जागृती पाटील तसेच मोठ्या प्रमाणात  ग्रामस्थ उपस्थित  होते.

ओसीनिक लॅबोरेटरीज कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावात

Image
ओसीनिक लॅबोरेटरीज कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावात बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावातील शेतात आढळून आल्याने खळबळ माजली आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा  निर्जन स्थळी बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याच काम हे भरपूर वर्षापासून सुरु असुन केमिकल माफिया व कारखान्यावर ठोस कारवाई होत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार होताना दिसून येत आहेत. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा विल्हेवाट लावणारी गावगुंड टोळकी दिवसगणीक अधिकच सक्रिय होत चाललेली असून कोलवडे, कुंभवली, पाम, टेंभी, नवापूर, पास्थळ, सालवड, सरावली खैरापाडा या भागात बोंबाबोंब झाल्यामुळे आता या माफियांनी थेट हरित पट्टा रसायनयुक्त पट्टा करण्यासाठी कंबर कसली आहे. शासन प्रशासनाचा या माफियांवर वचक नसल्यामुळे आणि कमी अवधीत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे माफिया आपल्याच आईच्या भूगर्भात रसायनयुक्त घनकचरा टाकण्याचा देशद्रोही कृत्य करत आहेत. पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत दहिसर तर्फे तारापूर या गावात दिनांक २० फेब्...

वाढवण बंदर विरोधात चाराेटीत रास्ता राेकाे आंदोलन

Image
वाढवण बंदर विरोधात चाराेटीत रास्ता राेकाे आंदोलन पालघर : पालघर जिल्ह्यातील हाेऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात आज (गुरुवार) वाढवण बंदर संघर्ष समितीने डहाणूतील चारोटी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे केला आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प  झाली आहे.  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी वाढवण बंदराच्या सर्व मान्यता प्राप्त झाल्या असून याच महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती , महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, समुद्रकन्या मंच सातपाटी, कष्टकरी संघटना, भूमी सेना व आदिवासी एकता परिषद व इतर समस्त बंदर विरोधी संघटना यांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे. चारोटी येथे आंदाेलकांनी रास्ता राेकाे केला. या आंदाेलनाच्या...

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...

Image
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न... बोईसर | पाम गावात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पाम कुंभवली विभाग हायस्कुल, पाम -टेभी या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर पार पडला. आपल्या आकर्षक प्रस्तुति करणासाठी प्रसिद्ध असलेल्या या संमेलनाने रसिकांचे मन जिंकून घेतले विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण व कौशल्य सर्वासमोर सादर केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त  बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रमप्रतिष्ठान संस्था संचलित पाम कुंभवली विभाग हायस्कूल, पाम-टेंभी येथे लेझीम, बँड व शिस्तबद्ध संचलनाच्या तालात अगदी दिमाखदार व मंत्रमुग्ध करणारा सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी सदर कार्यक्रमात सुमिटुमो कंपनीचे मिलिंद पाटील (एच.आर मॅनेजर) व राजेंद्र घरत( मेंटेनन्स मॅनेजर), जिंदाल स्टील वर्क्स कंपनीचे अमोल सूर्यवंशी (CSR हेड) व राहुल पांडे (welfare Officer) तसेच  विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता व वसई जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विनोद पिंपळे, संस्था अध्यक्ष प्रदीप पिंपळे यांचे सुपुत्र ...

कंत्राटी कामगारांच्या पगाराला ठेकेदारच लावताहेत चुना...

Image
कंत्राटी कामगारांच्या पगाराला ठेकेदारच लावताहेत चुना... बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रामधील कारखानदार व ठेकेदार यांच्या संगनमताने गेली अनेक वर्षे कामगारांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे.किमान वेतन कायदा तर सोडाच परंतु कामगारने केलेल्या कष्टाच्या पैशांवर ठेकेदार गबर होताना दिसून येत आहेत. अश्याच बोईसर शहरालगतच असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डि -०६ निर्वाण सिल्क मिल्स प्रा लि या कारखान्यात ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या शिवेश ठाकूर याचा वेतन ठेकेदार संजय सिंह यांनी थकवल्यामुळे कामगार शिवेश सिंह निराश झाला आहे.औद्योगिक क्षेत्रात कामगारांचे वेतन थकवण्याचे प्रकार सुरू असून एखाद्या कामगारांने तकादा लावला तरच त्याला वेतन मिळते नाहीतर गोरगरीब अशिक्षित कामगारांची चांगलीच आर्थिक पिळवणूक या मुजोर ठेकेदारांकडून केली जाते आणि या आर्थिक पिळवणूकीत कंपनी प्रशासन देखील सहभागी असतात . त्यापैकी एक कामगार यांनी कंपनी प्रशासन व ठेकेदाराच्या धमकीला न घाबरता कामगार उपायुक्त पालघर येथे लेखी तक्रार दाखल केलेली असून कामगार उपायुक्त दहिफळकर लवकरच त्याबाबत न्याय निवाडा करतील असे आश्वसित असलेला कामग...

मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उपसभापती मिलिंद वडे यांनी केले आयोजन

Image
मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उपसभापती मिलिंद वडे यांनी केले आयोजन बोईसर : मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पालघर पंचायत समिती आणि लूपिन ह्युमन वेल्फेअर अँन्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्तमाने उपसभापती मिलिंद वडे, पंचायत समिती पालघर यांनी ग्रामपंचायत कार्यालय हॉल, नवापुर येथे आयोजन केले होते. पालघर जिल्ह्यातील नवापुर गावात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 1 वाजे पर्यत ग्रामपंचायत कार्यालय हॉल, नवापुर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत आरोग्य शिबिर तपासणीला नवापुर ग्रामस्थानी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच लोकांनी याचा लाभ घेतला सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरान द्वारे मधुमेह, दमा, फुफ्फुसाचे आजार, उच्च रक्तदाब, हदयरोग सबंधी तपासण्या केल्या. त्याच सोबत रुग्णांनी X-Ray, ECG   टेस्ट करून शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यासोबतच त्यांना आजारावर मोफत औषधेही देण्यात आली. या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात नवापूर गावाच्या सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे, सदस्य आशिष पागधरे, विजय पागधरे, राकेश पागधरे सोबत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ...

भरदिवसा घरफोडी करण्याऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

Image
भरदिवसा घरफोडी करण्याऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात बोईसर : दिनांक ७ फेब्रुवारी रोजी बोईसर शहरातील सरावली येथील शादावल इंप्रेशन येथे सेफ्टी दरवाजाचे लॅचलॉक तोडून त्याआतील लाकड़ी दरवाजाची कड़ी कापून बेडरुममध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातील दागीने व रोख रक्कम असा एकूण २,१२,०००/- रू. किमतीचा माल घरफोडी करुन चोरी केल्या प्रकरणी बोईसर पोलीस ठाणे भा.दं.वि. सं. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, अनिल विभूते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करून योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे अनिल विभूते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी  पोउपनि गणपत सुळे व त्यांच्या टीम ने पथक तयार करुन तांत्रीक व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपीना बोईसर येथुन ताब्यात घेतले १) मोहमद शकीब मोहमद अंसारी (23 वर्ष ) २) मोहमद उमर महेफूज अहमद (20 वर्ष ) ३) फर्मान अहमद मुज्जमील अहमद (४१ वर्षे ) ४) मोहमद दानिश मोहमद वरीश मलीक (२४ वर्ष) हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश र...