Posts

सालवड गावात भंडाराचा राजा ५७ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Image
सालवड गावात भंडाराचा राजा ५७ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा   पालघर : पालघर जिल्ह्यातील सालवड गावात मोरे भंडारी समाज गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असुन या ५७ व्या वर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात असून  गणेशोत्सवादरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे गणेशोत्सव २०२३ ला उत्साहात सुरुवात झाली असुन लाडक्या बाप्पासाठी सुंदर मखर अन् फुलांची आरास करून, एकापेक्षा एक अफलातून सजावट केलेली दिसून येत यात लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्व जण उत्साहात गणरायाचं स्वागत करताना दिसत आहे फक्त घरातचं नव्हे तर मंडळाद्वारेदेखील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे  गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त जोरदार तयारी करतात व ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन आणि विसर्जन केले जाते. असाच मोरे भंडारी समाज गणेशोत्सव मंडळ सालवड गावातील सलग ५७ वर्षापासून साजरे करत असुन सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला या विसर्जन सोहळ्यासाठी मं...

कासा पोलीसांनी पकडला 19 लाख 48 हजाराचा गुटखा : एकाला अटक

Image
कासा पोलीसांनी पकडला 19 लाख 48 हजाराचा गुटखा : एकाला अटक  पालघर : आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पाश्वभुमीवर बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी कासा पोलीस ठाणे हद्दीत आंबोली बिट भागात पो.ना -प्रमोद धुम, पो.हवा-धांगडा, पो.ना - लाडवी हे प्रेट्रोलिंग करत असताना हळदपाडा गावाच्या हद्दीत संशयीत आयसर टेम्पो क्र. एमएच-48 सी.बी 5708 हा आढळून आला सदर टेम्पो थांबवुन पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र अधिसुचनाद्वारे वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध केलेला पान मसाला (गुटखा) टेम्पोतुन विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहतुक करुन घेऊन जात असताना मिळून आला आहे. यात हॉट पान मसाला, एच टू के तंबाखु, सनकी पान मसाला व पान मसाला जो मानवी जीवितास अपायकारक असे 15,064 पॉकेट असुन 19,48,800/- रूपये किमतीचा गुटखा व लाल रंगाचा आयसर टेम्पो 7 लाख रूपये असा एकूण 26,48,800/- रूपये किमतीचा मुद्देमाल कारवाई मध्ये जप्त करण्यात आला आहे. याबाबत कासा पो...

भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति

Image
भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति पालघर : भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी समाजसेवक व वरिष्ठ पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति करण्यात आली आहे. इल्यास पठाण हे एक समाजसेवक व खबरदार न्यूज़ चे संपादक असुन त्यांनी आपल्या कार्याने समाजसेवा करुन व पत्रकारीता द्वारे समाजात चांगला ठसा उमटवला आहे व त्याद्वारे नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच ची इल्यास पठाण यांना मोठी जबाबदारी देऊन पालघर जिल्ह्यात पक्ष व मंचाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करण्यासाठी तसेच पक्ष व मंच मजबूत करण्यासाठी सर्व शक्ति निशि योगदान देतील तसेच समाजातील सर्व घटकाना सोबत घेऊन पक्ष व मंचाची ध्येय धोरणे तसेच विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयन्तशील राहतील या हेतूने भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी इल्यास पठाण यांची नियुक्ति भारतीय जनता पार्टी पासमंदा मंच चे महाराष्ट्र अध्यक्ष सलमान खान यांनी केली आहे. यावेळ...

यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीभराव !

Image
यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीभराव ! उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी तात्काळ दखल घेत करुन घेतली साफसफाई   बोईसर: गणपती उत्सवात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखानदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर कधीकधी मोठ्या अपघातांना देखील सामोरे जावे लागत आहे. राज राजेंद्र इंडस्ट्रीज प्लॉट नं. जे. 173 या कारखान्याचा बांधकाम हे अधिकारी प्रोजेक्ट कंपनीकडून सुरू असून या कंपनीला कुणाचाही धाक नसल्यामुळे बोईसर येथील सुप्रसिध्द असलेल्या यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या  मुख्य रस्त्यावर राज राजेंद्र इंडस्ट्रीज कंपनीतील माती काढून जेसीबी ने उचलून ट्रक च्या सहाय्याने डी डेकोर प्लॉट नं. जे. 260/1 च्या बाजूच्या रिकामी जागेवर टाकण्याच काम चालु होते ही माती ट्रकच्या सहाय्याने घेऊन जात असताना मुख्य रस्त्यावर पडून चीखल होऊन मातीभराव पसरलेला असल्यामुळे ऐन गणेशोत्सवात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चिखलातुन जाव लागत होते  यात बाईक घसरुन अपघात होण्याची शक्यता होती. दरम्यान या प्रकरणाची तक्रार औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता मुकेश लांजेवार...

दिक्षांत समारंभ 2023 कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव येथे झाला संपन्न

Image
दिक्षांत समारंभ 2023 कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव येथे झाला संपन्न. पालघर : दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव, जिल्हा- पालघर येथे दिनांक  दीक्षांत समारंभ (पदवीदान समारंभ) पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीयुत अजित राणे एच आर मॅनेजर कोकियो कॅमलिन यांनी केले. या कार्यक्रमाकरिता श्रीयुत महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, पालघर व श्रीमती दिपाली सामंत सेवानिवृत्त प्राचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य चंदन बंजारा हे असुन कार्यक्रमाची  प्रस्तावना श्रीयुत प्रशांत बोकंद यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव मॅडम आणि आचवले मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती सुप्रिया चुरी मँडम यांनी केले असुन आभार प्रदर्शन  संजय भोई प्राचार्य यांनी केले. या कार्यक्रमात व्यवसायातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच वीजतंत्री व्यवसायातील प्रतीक जाधव व शुभम राठोड या प्रशिक्षणार्थ्यांचा जर्म...

जन्मदात्या आईनेच गळा दाबुन सहा दिवसाच्या चिमूरडीची केली हत्या

Image
जन्मदात्या आईनेच गळा दाबुन सहा दिवसाच्या चिमूरडीची केली हत्या   बोईसर : तारापूर घिवली येथील एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या सहा दिवसांच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. ही घटना पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील घिवली या गावात घडली आहे. या निर्दयी मातेने पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. श्रेया प्रभू (वय ३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असतानाही तिला आणखी एक मुलगा हवा होता मात्र तिसऱ्यांदा तिला पुन्हा मुलगी झाली. मुलगी नको म्हणून या निर्दयी महिलेने सहा दिवसांच्या नवजात चिमुकलीचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सकाळी एसटीने बाहेर पडली. बोईसर रेल्वे स्टेशन आणि तिथून बोईसर ते खार मुंबई येथे माहेरी गेली. माहेरी कोणीच नसल्याने तसेच मृत बाळाला फेकण्यासाठी य...

लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त बोईसर मध्ये रक्तदान शिबीर

Image
लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त बोईसर मध्ये रक्तदान शिबीर बोईसर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय ज. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉन बॉस्को शाळा बोईसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान’ आहे  हे ब्रीदवाक्य ऊराशी बाळगून आपण प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने कुटुंबात, समाजात व गावागावात पोहोचवावे तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे तसेच वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून शिवशक्ती सामाजिक संघटना, श्रमिक सेना कामगार संघटना आणि पालघर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक व मालक संघटने ने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मागील 28 वर्षापासून सलग बोईसरला रक्तदान शिबिराचे आयोजन करुन आतापर्यंत  6000 रक्त पिशव्या संकलित  करण्यात आल्या असून यावर्षी 145 रक्त दात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. यावेळी रक्तदान शिबिरात  आमदार राजेश ...