Posts

*स्थानिक जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण संखे यांनी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे केले आयोजन !*

Image
  *स्थानिक जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण संखे यांनी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे केले आयोजन !* बोईसर : दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक जनविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बोईसर येथील धनानी नगर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत हिरकणी महिला प्रभाग संघ संस्था बोईसर पदाधिकारी  सौ.अपूर्वा ठाकूर , BDSP सौ.  राधा शाहू , सौ. विभाता राऊत , सौ. प्रियंका पाटील व स्थानिक जनविकास प्रतिष्ठान धनानी नगर विभाग महिला अध्यक्षा सौ.रुपाली पिसाळ उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सौ.रुपाली पिसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले . सदर कार्यक्रमात महिलांशी संबंधित विविध व्यवसाय व उद्योगा विषयी माहिती महिलांना अभियानाच्या पदाधिकारी यांनी समाधानकारकपणे दिली. तसेच स्थानिक जनविकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महिला मार्गदर्शन शिबिरात सुमारे धनानी नगर , कृष्णा...

बोईसर मध्ये दोन लाखाची मांगितल्याप्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल

Image
बोईसर मध्ये दोन लाखाची मांगितल्याप्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल बोईसर : बोईसर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणावर दोन लाखाची खंडणी मांगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यतिन पिंपळे यांचा ट्रान्सपोर्टचा धंदा असुन मे. सडेकर इनवायरो इंजीनियरींग लिमीटेड हाय सीओडी इटीपी वॉटर हे भूखंड क्रमांक इ. १३३ या कंपनीत आणुन सोडण्याच काम करतात परंतु दि. ३० जुलै २०२३ रोजी मे. सडेकर इनवायरो इंजीनियरींग लिमीटेड या कंपनीच्या गोडाऊन मध्ये स्टोरेज करण्यात आलेले हाय सीओडी इटीपी वॉटर हे मे. सडेकर इनवायरो इंजीनियरीगं लिमीटेड यांच्या भूखंड क्रमांक इ. १३३ या कंपनीत आणुन सोडत असताना यतीन पिंपळे ह्याचा वाहन चालक  व मालकीचा टैंकर क्र. MH-06/ AQ-4164 हा कंपनी मध्ये नेत असताना 1) एम. के. अन्सारी, 2) दुर्गेश पाठक, 3) विकास सिहं, 4) विजय प्रसाद यानी टैंकर अडवुन काही एक कारण नसताना, यतीन पिंपळे यांच्या मालकीचा वरील नमुद क्रमाकांच्या टँकर जवळ जाऊन टँकरच्या व्हॉल मध्ये मालकाच्या परवानगीविना, खोडसाळपणा करून ड्रायव्हरला गाडीच्या कॅबीनमधुन खाली उतरवुन काहीएक कारण नसताना शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिली व गाडीचे विनापरवान...

बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न

Image
बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न  जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयन्त केला जाईल - सरावली प्रभाग संघटक अजिज मेमन बोईसर : बहुजन विकास आघाडीचे बोईसर शहरातील अवधनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनसामान्यांना त्यांच्या तक्रारी आणि समस्या घेऊन जाणे आता सुकर होणार असुन जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील. त्यांच्या समस्या-अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे सरावली प्रभाग संघटक अजिज मेमन यांनी उद्‍घाटन प्रसंगी व्यक्त केला.  यावेळी महेंद्र राजपूत, युवा पालघर जिल्हा अध्यक्ष, पालघर तालुका अध्यक्ष कामनीष राउत, पालघर तालुका युवा अध्यक्ष अमर सावंत,पालघर तालुका युवा उपाध्यक्ष,हेमंत कदम,पालघर तालुका संपर्क प्रमुख,अजीज़ मेमन,सरावली प्रभाग संघटक, अविनाश मिश्रा, बोईसर तालुका अध्यक्ष, नितीन चौधरी, विभाग संघटक बोईसर, अभिनय चौधरी, युवा ब...

बोईसर मध्ये अवैध इमारतीत शॉक लागून मजदूराचा मृत्यू

Image
बोईसर मध्ये अवैध इमारतीत शॉक लागून मजदूराचा मृत्यू बोईसर: सरावली ग्रामपंचायत हद्दीत सरकारी भूखंडावर सुरू असलेल्या बेकायदेशीर इमारतीचा बांधकाम सुरू असताना वीजेचा करंट लागून एका मजदूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सरावली ग्रामपंचायत हद्दीत शुक्ला कंपाऊंड व शितल नगर दिवाकर चाळीला लागून सरकारी भूखंडावर असलेल्या चाळीतील रूम दिलीप नावाचा दलाला द्वारे बाहेरील इसमास विक्री करून जुन्या रूम तोडून तेथे दुमजली इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. सदर बांधकाम ग्रामपंचायतीकडून बांधकाम केलेल्या गटारीवर सुरू असून महावितरण कंपनीच्या ११ के व्हि वाहिनीच्या जवळच बांधकाम सुरू केल्यामुळे दुमजल्यावर काम सुरू असताना विद्युत वाहिनीच्या संपर्कात येत जोरदार करंट लागून एका निष्पाप मजदूराचा मृत्यू झालेला आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत देण्यात आलेली नसून घटना घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नसल्यामुळे नेमका त्या मजदूराचा मृतदेह कुठे नेण्यात आला आहे या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान सरकारी भूखंडावर अशा प्रकारे ...

कारखान्यांतील कामगाराची सुरक्षा रामभरोसे : बॉम्बे रेयॉन कारखान्यात 31 वर्षीय तरुणाने गमवला जीव

Image
कारखान्यांतील कामगाराची सुरक्षा रामभरोसे : बॉम्बे रेयॉन कारखान्यात 31 वर्षीय तरुणाने गमवला जीव   बोईसर : कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून कारखानदारांनी कामगारांच्या सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानेच बहुतांश अपघात ओढवले आहेत यात कारखान्यांत घडलेल्या अपघातांमध्ये कामगारांचा मृत्यू होत आहे. अश्याच तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन नावाने ओळखली जाणारी कपडा निर्मित कारखान्यात दिनांक २ जून रोजी पत्र्याच्या शेडच काम करत असताना वरून खाली पडून एका ३१ वर्षीय तरूण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात ADR  दाखल करत बोईसर पोलिस ठाण्यात प्रकरण वर्ग केलेला होता. कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा दाखला या अपघातातून सरळ सरळ दिसत असताना या ३१ वर्षीय युवकाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून ठेकेदारावर गुन्हां दाखल करत कंपनी प्रशासनाला मोकळीक देण्यात आली आहे. ना हक जीव गमवावा लागलेल्या या ३१ वर्षीय तरूणाला कंपनीकडून भरपाई न मिळावी म्हणून कंपनीकडून जबाबदार व्यक्ती म्हणून सुरक्षा अधिकारी व कंपनी प्...

सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहाथ पकडले

Image
सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहाथ पकडले पालघर : जिल्हा परिषद पालघर येथील सहाय्यक लेखा अधिकारी रमेश यशवंत मौळे (४५) यांना पालघरच्या लाचलुजपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे. जिल्हा परिषदेच्या लेखा शाखा विभागात वर्ग- 3 कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश मौळे यांनी ग्रामपंचायत कासटवाडी-रामनगर (जव्हार) येथे नळ पाणीपुरवठा केलेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी रमेश मौळे याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी करून दुपारी आपल्या कार्यालयात स्वीकारताना प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई चालू आहे. विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल नऊ कारवायांमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे  दिली.  नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शा...

गुंदले ग्रामपंचायत हद्दीत परवानगी न घेताच बांधली ईमारत

Image
गुंदले ग्रामपंचायत हद्दीत परवानगी न घेताच बांधली ईमारत  पालघर: मौजे गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत नवीन इमारतीच्या बांधकामाला ग्रामपंचायती कडून ना हरकत दाखला न घेताच बांधकाम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावरील बस स्टॉप समोर रोड मार्जिनल स्पेसमधे एका इमारतीचे बांधकाम जोमाने सुरू असून प्रशासन मात्र त्या अवैध बांधकामाला आधार देत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणत्याही नवीन इमारतीच्या बांधकामाकरीता ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घेऊन जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच बांधकाम सुरू करणे आवश्यक असताना इमारतधारकाने प्रशासनाला न जुमानता कुठलीही परवानगी न घेता मुख्य रस्त्यावरील रोड मार्जिनल स्पेसमधे इमारतीचे बांधकाम सुरू करून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले आहे. तर रोड मार्जिनल स्पेसमधे अशा प्रकारे अवैध बांधकाम सुरू असल्यामुळे रस्यावर होणाऱ्या अपघातांना नेमका जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच अश्या अवैध बांधकामाला ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. "सदर बांधकामाला ना हरक...