Posts

कॅलेक्स कंपनीकडून तयार उत्पादनाची बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांच्या ताब्यात !

Image
  कॅलेक्स कंपनीकडून तयार उत्पादनाची बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांच्या ताब्यात ! पामचे उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या सतर्कतेमुळे बोईसर पोलिस व प्रदूषण विभागाची कारवाई सुरू क्राईम अलर्ट: स्वप्निल पिंपळे बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलेक्स केमिकल कंपनीकडून वारंवार पर्यावरण नियमांचे उल्लंघन केले जात असतानाच आज पुन्हा एकदा तयार उत्पादन बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दिनांक १ जून २०२३ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान प्लॉट क्रमांक एन १०२/९१ या कारखान्यातून तयार उत्पादन (lumefantrine) कागदपत्रे तयार न करता तसेच आर टी ओ विभागाकडून साहित्याची वाहतूक करण्याची परवानगी नसताना फोरक्लीप वाहनातून बाहेर वाहतूक करत असताना पाम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या निदर्शनास येताच बोईसर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारखानाला WHO तसेच USFDA या दोन राष्ट्रीय मान्यताप्राप्त दर्जा असताना सदर उत्पादन उचित कागदपत्रे तयार न करता बेकायदेशीर वाहनातून बेकायदेशीर वाहतूक करत असताना या कारखानाला काळ्या यादीत का टाकू नये ? पोलि...

पाम गावातील गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात संपन्न

Image
पाम गावातील गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात संपन्न  बोईसर : पाम गावात दिनांक २८ व २९ मे रोजी गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा गावदेवी मंदिर मंडळ यांच्या उत्तम नियोजनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाम गावात गावदेवी मातेच्या सोहळ्या निमित्त पहिल्यादाच एवढ्या मोठ्या यात्रेच आयोजन करण्यात आले होते पाम गावाच्या मैदानावर यात्रेसाठी मनोरंजनाची वेगवेगळी साधने आणली होती यात लहान मुलांचे आकर्षण असलेले आकाश पाळण्‍यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई सजलेले होते यात खेळण्याचे स्टॉल, जंम्पिग पैड, खाद्य पदार्थाचे स्टॉल, ट्रेन अश्या वेगवेगळ्या मनोरंजन साहित्य सहित लोकांनी गर्दी करुन कार्यक्रमाच आनंद घेतला. यात रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी आठ वाजता प्रथम गणेश पुजन अधीर देवतांची स्थापना करून दुपारी १२ वाजेपासून मंदिर देवतांचे पुजन, मूर्तीचे जलाधिवास, दुपारी महाप्रसाद भंडारा व सायंकाळी मूर्तींची संपूर्ण गावात वाजत गाजत गावाती नाजत मिरवणूक काढण्यात आली होती व रात्री महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आले होते. तसेच स...

पाम गावाजवळ कार बाईकचा भीषण अपघात, अपघातात दोन जणाचा मृत्यु

Image
पाम गावाजवळ कार बाईकचा भीषण अपघात, अपघातात दोन जणाचा मृत्यु बोईसर : दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान बोईसर नवापूर मार्गावरील पाम येथे एक भरधाव कार व दुचाकीमध्ये‌ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला असून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम करून सुट्टी झालेल्या दोन कामगार आपल्या  नवापुर येथील घरी जात असताना नांदगाव- आलेवाडी समुद्र किनारी मौज मस्ती करण्यासाठी गेलेल्या दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या भरधाव कार चालकांनी जोरदार धडक देत या तरुणांना जागीच चिरडले आहे.  पाम चुना भट्टी जवळ हि घटना घडलेली असून या अपघातात नरेंद्र बारी (वय 45 वर्ष ) व भूपेश बारी (वय 34 वर्ष ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र बारी हे तारापुर औद्योगिक मधील अनुह फार्मा कंपनी तर भूपेश बारी हे जीएम सिंथेटिक कंपनीत काम करीत होते रविवारी संध्याकाळी 7 वाजता कामावरुन घरी जात असताना पाम गावाजवळ नांदगाव समुद्रकिनाऱ्यावरून बोईसर कडे येणाऱ्या भरधाव कार नंबर एम.एच.48 ए. के 796 कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली ती धडक इतकी जोरदार होती की याम...

अवैध दारूची विक्री करण्याऱ्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Image
अवैध दारूची विक्री करण्याऱ्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या  पालघर :  दिनांक 20/05/2023 रोजी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आझाद ऊर्फ नसीमउद्दीन निझामउद्दीन हाफेस रा. नवसारी गुजरात हा खानवेल येथून वेगवेगळ्या मोटार कारमध्ये अवैध्यरित्या वेगवेगळ्या प्रकारची दारू भरून ती जव्हार - मोखाडा मार्ग धुळे येथून गुजरात राज्यात विक्रीकरिता घेवून जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अनिल विभूते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व संजयकुमार ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, मोखाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी पथके तयार करून कारवाई चे आदेश दिले त्याअनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील निळमाती येथे नाकाबंदी सुरु केली नाकाबंदी दरम्यान संशयित वाहने चेक करत असताना दिनांक 21/05/2023 रोजी रात्री 03.35 वा. चे सुमारस जव्हार  बाजुकडून संशयित स्कॉर्पियो  कार क्रमांक एम.एच.02/सी.बी /4607 ही गाडी न थांबता नाकाबंदीला लावलेले बैरीकेट्स उडवून पळून जात असताना नाकाबंदी करीत असलेल्या अंमलदारांनी गाडीचा पाठलाग करुन पकडले असता कारमधी...

शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Image
शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न  स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याचा कंपन्यांनी विचार करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पालघर : शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा 2023 बोईसर येथील सर्कस ग्राउंड येथे शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र सिंग व सचिव जगदीश धोडी यांच्या उत्तम नियोजनात आंंनदात पार पडला. लग्न हा आंनदाचा प्रसंग असतो परंतु आर्थिक परिस्थितिमुळे सगंळ्यानाच लग्न थाटामाटात करता येत नाही त्यामुळे समाजाचे उत्तरदायित्व समजून आणि आपली सामाजिक बांधिलकी समजून अश्या प्रकारचा सामूहिक सोहळा करतात तसेच प्रत्येकाला स्वता:च्या लग्नात कोणी प्रतिष्ठित लोक यावे असे वाटत असते परंतु आर्थिक परिस्थिति चांगली नसते त्यामुळे अश्या सामुहिक सोहळा करुन हा सर्वाच्या सा...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वांणगाव तर्फे बोईसर मध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन

Image
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वांणगाव तर्फे बोईसर मध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन पालघर : मा.ना.श्री मगंल प्रभात लोढा, मंत्री कौशल्य विकास रोजगार,उदयोजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून संपुर्ण राज्यभर दिनांक ०६ मे २०२३ ते दिनांक ०६ जून २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे संपूर्ण राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत विधानसभा मतदार संघ निहाय आयोजन केलेले आहे. त्यानुसार डी.ए.दळवी संचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र् राज्य मुबंई तसेच  कि.वा.खटावकर, सहसंचालक प्रादेशिक कार्यालय मुबंई यांच्या मार्गदर्शनानुसार व निर्देशानुसार, महेशकुमार दयांनद सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली  बोईसर विधानसभा मतदारसंघातील औ.प्र.संस्था वानगाव यांच्या मार्फत दिनांक 18 मे 2023 रोजी वंजारी समाज हॉल अमेय पार्क नवापूर रोड बोईसर , जि.पालघर येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन केले होते, राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर...

जनसंवाद अभियानातुन दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यात मनोर पोलीसांना आले यश

Image
जनसंवाद अभियानातुन दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यात मनोर पोलीसांना आले यश पालघर : बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन जनसंवाद अभियानातुन पुन्हा एकदा गुंह्याची उकल करण्यात यश आले असुन मनोर पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या तयारीत असण्याऱ्या आरोपींना मनोर पोलीसांनी पकडुन कारवाई करण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी सुरु केलेल्या जनसंवाद अभियानातर्गत प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक गांव एक अंमलदार ही योजना राबवण्यात येत आहे. अश्याच गोवाडे या गावाकरिता पोलीस अंमलदार पोना / 1123 राजु सुकऱ्या भोईर यांची नेमणुक केलेली होती. दिनांक 16/05/2023 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका सतर्क ग्रामस्थाने मनोर पोलीस ठाणे येथे फोन करुन कळविले की, मौजे गोवाडे गावचे हद्दीमध्ये रोहित जीवन संखे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या पेट्रोल पंपा जवळील शेतामध्ये काही संशयीत इसम दबा धरुन बसले आहेत. त्यामाहितीनुसार मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. उमेश पाटील, सपोनि केशव राठोड हे पथकासह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले पोलीसांना पाहताच तेथे दबा धरुन बसलेले संशयित...