Posts

*ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख*

Image
  *ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख* पालघर :डहाणू बाहेरच्या लहान लहान संघटना, डहाणू ग्रामीण क्षेत्रात येवून आपले राजकीय जाळे जोमाने विणत असताना डहाणू तालुक्यातील काँग्रेस अजून तालुक्यातील पाड्या पाड्यात पोहोचली नाही.कार्यकर्ते नवीन निर्माण झाले नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांची हजेरी नगण्य अशी झाली आहे अश्या बिकट परिस्थितीत डहाणू काँग्रेस ची धुरा एका धुरंधर आदिवासी नेत्याकडे देणे अतिशय आवश्यक आणि महत्वाचे झाले आहे. जव्हार मोखाडा भागात बळवंत गावित यांच्या रूपाने एक नवीन खंबीर नेतृत्व उभे राहिले आहे,याची प्रचिती नुकतीच दिसून आली. प्रचंड जनसंपर्क व वेळप्रसंगी पक्षासाठी स्वखर्चाने कार्यक्रम यशस्वी करणारा एक सुशिक्षित आदिवासी नेता म्हणून जिल्ह्याला त्यांची ओळख झाली आहे.त्यांच्या नेतृत्वात संपत पवार हे यशस्वी जव्हार तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले. परंतु डहाणू तालुक्याची परिस्थिती फार गंभीर आहे. तालुक्यात काँग्रेस केवळ औषधाला उरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.वास्तविक हा तालुका मंत्री पदे भोगलेल्यांचा तालु...

डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक

Image
  डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक पालघर : पालघर शहरात भरधाव डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.  दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी पालघर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये दुपारी मनोरहुन पालघरच्या दिशेने येणाऱ्या  डंपरने एक टेम्पो, एक रिक्षा, तीन कार व एक दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दोन विद्यार्थी सह एक दुचाकीस्वार ही जख़्मी झाला.    या घटने मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी तीन जण जख़्मी झाले असून या अपघातात सर्व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहेत.तसेच डंपर चालकाला पोलीसानी ताब्यात घेऊन वाहतुक कोंडी ही लवकर सुरळीत करण्यात आली.

वादातुन अपहरण प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Image
  वादातुन अपहरण प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पालघर :बोईसर शहरात गणपती मंडपाच्या वादातुन अमृत धोडी यांना सुधीर विचारे, विक्रांत संखे व अन्य जणावर अपहरण करून मारण्याचा प्रयन्त केल्याची घटना समोर आली आहे त्याबाबत बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. यशवंत सृष्टी येथील साईबाबा मंदीरा समोर गणपती मंडपाचे काम दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरु असताना अमृत प्रकाश धोडी यांना मंडपाच्या वादातुन सुधीर प्रभाकर विचारे, विक्रांत जयवंत संखे यांच्यासह अन्य काही जणानी धोडी यांना वादानंतर जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसवून मनोर येथे नेण्यात आले होते. अमृत धोडी यांनी सांगितले प्रमाणे तीन चारचाकी वाहन घेऊन आलेल्यांनी धोडी यास मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना माझा मोबाईल गाडी बाहेर फेकून मला शिवीगाळ केली. तर माझा अपहरण होत असताना उपस्थित लोकांनी माझ्या घरी सांगितल्यानंतर सुधीर विचारे ला आलेल्या फोन मुळे माझी सुटका झाली अन्यथा माझं मरण अटळ होता. दरम्यान सुटका झालेल्या अमृत धोडी आपला प्राण वाचवत चिल्हार फाटा येथून खाजगी वाहनातून थेट बोईसर पोलिस ठाणे गाठत आपली फिर...

*आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात 'सुराज्य अभियान’चे दादर, मुंबई येथे आंदोलन !*

Image
 *आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात 'सुराज्य अभियान’चे दादर, मुंबई येथे आंदोलन !*_  *गणेशोत्सवात भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची लुटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी !*   राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसेच्या दीडपटच दर आकरण्याचा शासनाचा निर्णय असतांना गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारून प्रवाशांची प्रचंड लुटमार करत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटांचे भरमसाठ तिकिटदर उघडपणे देण्यात आले आहेत. अशा प्रकारे नागरिकांची उघडपणे आर्थिक लुट चालू असूनही त्यांवर प्रशासन कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. *या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’च्या वतीने मुंबईतील दादर (पूर्व) येथील खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग केंद्रांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले* . या आंदोलनामध्ये भाविकांची आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.    खासगी ट्रॅव्हल्स दरवाढीच्या विरोधात राज्य परिवहन विभागाकडे ...

बोईसर येथे धर्मवीर आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथि कार्यक्रम संपन्न

Image
  बोईसर येथे धर्मवीर आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथि कार्यक्रम संपन्न  पालघर :बोईसर शहरात ओस्तवाल एम्पायर गेट जवळ 26 ऑगस्ट 2022 रोजी आनंद दिघे युवा प्रतिष्ठान द्वारे सकाळी 9.30 वाजता आनंद दिघे यांच्या 21 वी पुण्यतिथि निमित्त भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.याच आयोजन आनंद दिघे युवा प्रतिष्ठान चे संपर्क प्रमुख आतिश मदन यांच्या सहकार्याने ग्रामीण विभाग अध्यक्ष साहिल वडे यांनी आयोजित केला. यावेळी कार्यक्रमात पालघर जिला संपर्क प्रमुख आतिश मदन राउत , जिला प्रमुख मंगेश नागणे, बोईसर ग्रामीण विभाग प्रमुख साहिल वड़े एवं सामाजिक कार्यकर्ता तसेच युवा पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

वारांगाड्यात आदिवासींच्या जमीनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण !

Image
  वारांगाड्यात आदिवासींच्या जमीनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण ! खोल्या व गाळ्यांचा बांधकाम करत मोठ्या चाळीचे निर्माण ! तलाठी साधना चव्हाण यांनी केली तहसीलदार सुनील शिंदे कडे कारवाईची मागणी ! बोईसर: मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मान जवळील मौजे वारांगडे सर्वे क्रमांक - ८१, ८२, ८५, ९७, ३४, ३५, ३१, ५२ ,२५, व २७ या आदिवासी लोकांच्या जमिनीवर मुन्ना तिवारी, प्रमोद सिंग, शिवशंकर यादव, जगदीश पन्नालाल विश्वकर्मा, मोहन पन्नालाल विश्वकर्मा, सलिम मनिहार , प्रमोद सिंग, मारूफ खान, बबलू खान, या परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर खोल्या व चाळीचे बांधकाम करून विकण्याचे काम करत आहेत. सदर भूखंड आदिवासी लोकांना शेतीसाठी वाटप केलेला असून दिवसेंदिवस जमिनीचे वाढते भाव पाहता अशिक्षित आदिवासी लोकांची फसवणूक करत परप्रांतीय लोकांनी नोटरी करून जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्याचे देखील दिसून येत आहे. बोईसर मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी सजा मान येथिल तलाठी साधना चव्हाण यांनी सदर बांधकामाची पाहणी करत पंचनामे तयार करून सदर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार सुनील शिंदे यांना अहवाल सादर केलेला असून काह...

कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Image
 कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप  पालघर : कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर, तर्फे कै. सौ. प्रिया प्रवीण संखे यांच्या स्मरणार्थ  पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील मुकबधिर बाल विकास केद्रे डहाणु येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रॅक्टिकल बुक्स व कंपास पेटी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण संखे यांनी केले होते यामध्ये 90 विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण संखे , प्रमुख पाहुणे श्री रामसिंग ठाकूर , श्री अजय चौबे , श्री राजेश यादव व श्री राजेश लाटा या मान्यवरांच्या हस्ते अपंग मुक बधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक दाभाडे सर व शाळेचे शिक्षक वर्गही उपस्थित होते.