Posts

Showing posts from November, 2022

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश

Image
  पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश  पालघर : पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये दिनांक 03/12/2022 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 16/12/2022 रोजी 24.00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे,तसेच ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोच...

पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी एसीबी च्या ताब्यात

Image
  पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी एसीबी च्या ताब्यात पालघर : पालघर लोहमार्ग पोलिसांचे पोलीस नाईक अकिल पठाण वय 32 वर्ष (वर्ग -3) व पोलीस शिपाई समाधान नरवाडे वय 37 वर्ष ( वर्ग -3) यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडले आहे. पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांना गुटख्यांची वाहतूक करताना रंगेहात पकडले होते, परंतु कारवाई करण्याऐवजी कारवाई न करण्यासाठी व यापुढेही प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दर महिना हप्ता म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने याची तक्रार पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना केली यांनंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबत पडताळणी केली असता दोन्ही कर्मचाऱ्यानी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची एकत्रित मांगणी केली होती त्यानुसार सापळा रचून दिनांक 28/11/2022 रोजी 17.00 वाजता तक्रारदार यांच्याकडून 10,000 /-रु लाचेची रक्कम स्वीकारताना डहाणु रेल्वे स्टेशन येथे दोन...

पाम गावच्या हद्दीत असलेल्या वृदावन नगरीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: चार जण पोलीसाच्या ताब्यात

Image
पाम गावच्या हद्दीत असलेल्या वृदावन नगरीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: चार जण पोलीसाच्या ताब्यात पालघर : पालघर पोलिस दलाकडून 24/11/2022 रोजी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार  पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून जिल्ह्यातील विविध महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावून तसेच कोम्बिग ऑपरेशन राखवून अवैध धंद्यावर कारवाई तसेच गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. या नाकाबंदी तसेच कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले त्या नुसार गुप्त माहिती द्वारे पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्याच्या पाम गावाच्या हद्दीतील वृदावन नगरी सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर छापा टाकून चौघांना अटक करण्यात आली आहे. या चारही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी असून त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप आणि १४ मोबाईल जप्त केले आहेत. पालघर जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाम परिसरातील एका इमारतीत संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी या इमारतीची झडती घेतली व गोकुल...

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत :पाम ग्रामपंचायत

Image
 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत :पाम ग्रामपंचायत अग्रेसर पालघर :राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर केला. यात सदस्य पदासह सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे.ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली  तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची  निवड ही थेट जनतेतून करण्यात येते.त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका जाहीर  झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण अधिकच तापलेले असून गावा गावात आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. अश्याच निवडणूकीत बोईसर तारापुर एम.आय.डी.सी लगत असलेल्या पाम  ग्रामपंचायतीचा देखील कार्यकाळ पूर्ण होत असून डिसेंबर मध्ये घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत पाम ग्रामपंचायतीचा सामावेश...

15 हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Image
  15 हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंचाड (वर्ग-3) चे मंडळ अधिकारी सुरेंद्र काशीनाथ संखे ( वय 58 वर्ष ) यांना लाच मांगणी करुन स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो ठाणे विभागाने ताब्यात घेतले आहे.   तक्रारदार यांनी खानिवली गाव, तालुका वाडा येथे सर्वे नं.105 मधील 1 हेक्टर 33 आर ही जमीन खरेदी केली होती त्याबाबत फेरफार नोंद करण्यासाठी लोकसेवक सुरेंद्र संखे (मंडळ अधिकारी) यांनी 30,000/-रूपये लाचेची मांगणी केल्याबाबत तक्रार करण्यात आली त्या अनुषगाने 21/11/2022 रोजी तक्रारदार यांनी लोकसेवक सुरेंद्र संखे यांची कंचाड मधील मंडळ अधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेतली असता. तड़जोड़ी अंती 25,000/- रु रकमेची मांगणी केल्याचे पडताळणी दरण्यान निष्पन्न झाले.     यात दिनांक 21/11/2022 रोजी कंचाड मंडळ अधिकारी कार्यालय येथे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लोकसेवक यांनी मांगणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम देण्याकरिता भेटले असता लोकसेवक सुरेंद्र संखे यांनी त्यांच्या कैबीन मध्ये 15,000/- रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्या...

तलाठी कार्यालय बोईसर तर्फे नविन मतदार नोंदणी करीता जनजागृती रैली

Image
  तलाठी कार्यालय बोईसर तर्फे नविन मतदार नोंदणी करीता जनजागृती रैली  बोईसर :दिनांक 09/11/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता नवीन मतदार नोंदणीसाठी तलाठी कार्यालय, बोईसर द्वारा सेवाश्रम विद्यालय, बोईसर च्या विद्यार्थी समवेत हातात बैनर घेऊन बोईसर मध्ये रैली काढण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत 131 बोईसर ( अ.ज ) विधानसभा मतदार संघ यादीच्या नूतनीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षक कार्यक्रम 2023 अंतर्गत अलग अलग उपक्रम दिनांक 09 नोव्हेबर ते 08 डिसेबर पर्यत आयोजीत करण्यात आले आहे. यामध्ये एकत्रित प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धि, दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी, मतदार नोंदणी साठी 4 विशेष शिबिरे, ग्रामसभा मतदार यादी वाचन व नोंदणी, विद्यार्थी,दिव्यांग, महिला यासाठी विशेष शिबीर, तृतियपंथी, देह व्यवसाय करण्याऱ्या महिला, घर ...

स्फोट झालेल्या भगेरिया कारखान्याची विरोधी पक्षनेता अंबादास दानवे नी केली पाहणी

Image
 स्फोट झालेल्या भगेरिया कारखान्याची विरोधी पक्षनेता अंबादास दानवे नी केली पाहणी नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि कंपन्यांची मिली बघत असल्यामुळे कामगारांना नाहक जीव गमावा लागत आहे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  बोईसर -बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात दिनांक २६ ऑक्टोबर 2022  रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान भगेरिया इंडस्ट्रीज कारखान्यात Autoclave या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊन तीन कामगार मृत्यू तर बारा कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दखल घेत 2 नोव्हेंबर ला जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन विचारपुस केली तर  दुर्घटनाग्रस्त कंपनीची पाहणी केली. यावेळी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच त्यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत म्हणाले दोषी कारखान्यांना पाठीशी घालत असाल तर तुमच्यावरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच रिऍक्टर आणि बॉयलर बाबत सरकारने योग्य क...