जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत :पाम ग्रामपंचायत

 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत :पाम ग्रामपंचायत अग्रेसर


पालघर :राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर केला. यात सदस्य पदासह सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे.ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली  तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची  निवड ही थेट जनतेतून करण्यात येते.त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका जाहीर  झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण अधिकच तापलेले असून गावा गावात आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.

अश्याच निवडणूकीत बोईसर तारापुर एम.आय.डी.सी लगत असलेल्या पाम  ग्रामपंचायतीचा देखील कार्यकाळ पूर्ण होत असून डिसेंबर मध्ये घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत पाम ग्रामपंचायतीचा सामावेश  असून ही निवडणूक चूरशी होणार असे चिन्ह दिसून येत आहे.

यात पाम गावात एकूण 4 वार्ड असून यामध्ये वार्ड क्र.1 मध्ये उमेदवार सदस्य संख्या 2 असून या मध्ये पुरुष 207 व महिला 189 असे एकूण 396 मतदार आहे, वार्ड क्र.2 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 149 व महिला 145 असे एकूण 294 मतदार आहे, वार्ड क्र.3 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 245 व महिला 258 असे एकूण 503 मतदार आहे, तर वार्ड क्र 4 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 293 तर महिला 232 असे एकूण 525 मतदार आहे असे पाम गावात 1718 मतदार असून मतदाते नक्की कोणाला १८ डिसेंबरला होणाऱ्या मतदानात कोणाला निवडून देणार या कड़े सर्वाचे लक्ष्य लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी