तलाठी कार्यालय बोईसर तर्फे नविन मतदार नोंदणी करीता जनजागृती रैली
तलाठी कार्यालय बोईसर तर्फे नविन मतदार नोंदणी करीता जनजागृती रैली
बोईसर :दिनांक 09/11/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता नवीन मतदार नोंदणीसाठी तलाठी कार्यालय, बोईसर द्वारा सेवाश्रम विद्यालय, बोईसर च्या विद्यार्थी समवेत हातात बैनर घेऊन बोईसर मध्ये रैली काढण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत 131 बोईसर ( अ.ज ) विधानसभा मतदार संघ यादीच्या नूतनीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली.
मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षक कार्यक्रम 2023 अंतर्गत अलग अलग उपक्रम दिनांक 09 नोव्हेबर ते 08 डिसेबर पर्यत आयोजीत करण्यात आले आहे. यामध्ये एकत्रित प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धि, दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी, मतदार नोंदणी साठी 4 विशेष शिबिरे, ग्रामसभा मतदार यादी वाचन व नोंदणी, विद्यार्थी,दिव्यांग, महिला यासाठी विशेष शिबीर, तृतियपंथी, देह व्यवसाय करण्याऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ति, दावे व हरकती निफालात काढण्यास कालावधी, अंतिम मतदार यादीची प्रसिद्धि असे अलग अलग उपक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी तलाठी कार्यालय बोईसर द्वारे रैलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रैलीत उज्वला पाटील - तलाठी बोईसर, हितेश राउत - तलाठी सरावली, अतुल अंभोरे - अव्वल कारकुन, हितेश भोईर, विपिन पाटील, नितिन धोडी, कर्मचारी तलाठी तसेच सेवा आश्रम विद्यालय चे शिक्षक सचिन भालेकर, व मेघना राउत यांनी रैलीत सहभाग घेतला.
Comments
Post a Comment