पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी एसीबी च्या ताब्यात
पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी एसीबी च्या ताब्यात
पालघर : पालघर लोहमार्ग पोलिसांचे पोलीस नाईक अकिल पठाण वय 32 वर्ष (वर्ग -3) व पोलीस शिपाई समाधान नरवाडे वय 37 वर्ष ( वर्ग -3) यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडले आहे.
पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांना गुटख्यांची वाहतूक करताना रंगेहात पकडले होते, परंतु कारवाई करण्याऐवजी कारवाई न करण्यासाठी व यापुढेही प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दर महिना हप्ता म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने याची तक्रार पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना केली यांनंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबत पडताळणी केली असता दोन्ही कर्मचाऱ्यानी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची एकत्रित मांगणी केली होती त्यानुसार सापळा रचून दिनांक 28/11/2022 रोजी 17.00 वाजता तक्रारदार यांच्याकडून 10,000 /-रु लाचेची रक्कम स्वीकारताना डहाणु रेल्वे स्टेशन येथे दोन्ही आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे व पुढील कारवाई चालू आहे.
Comments
Post a Comment