स्फोट झालेल्या भगेरिया कारखान्याची विरोधी पक्षनेता अंबादास दानवे नी केली पाहणी
स्फोट झालेल्या भगेरिया कारखान्याची विरोधी पक्षनेता अंबादास दानवे नी केली पाहणी
नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि कंपन्यांची मिली बघत असल्यामुळे कामगारांना नाहक जीव गमावा लागत आहे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
बोईसर -बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात दिनांक २६ ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान भगेरिया इंडस्ट्रीज कारखान्यात Autoclave या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊन तीन कामगार मृत्यू तर बारा कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दखल घेत 2 नोव्हेंबर ला जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन विचारपुस केली तर दुर्घटनाग्रस्त कंपनीची पाहणी केली.
यावेळी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच त्यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत म्हणाले दोषी कारखान्यांना पाठीशी घालत असाल तर तुमच्यावरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तसेच रिऍक्टर आणि बॉयलर बाबत सरकारने योग्य कायदे करण्याची आवश्यकता असल्याचं सांगत या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि कंपन्यांची मिली बघत असून यामुळे कामगारांना नाहक जीव गमावा लागत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला .
दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, कारखाना मालक आपला पैसा वाचविण्यासाठी अकुशल कामगार ठेवून आपला काम करून घेत असल्यामुळे अपघात घडत आहेत. योग्य उपकरणांसाठी योग्य कुशल कामगारांची नेमणूक करणे आवश्यक आहे तर औद्योगिक आरोग्य व सुरक्षा अधिकारी कारखान्यांची नियमित तपासणी करत नसल्यामुळे असे अपघात घडत आहेत. तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची व्यापकता व घडणारे अपघात पाहता मुंबई गुजरात सारख्या सुविधा देणारे इस्पितळाकरिता स्थानिक पातळीवरून मागणी केल्यास शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल असे देखील दानवे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment