15 हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात

 15 हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंचाड (वर्ग-3) चे मंडळ अधिकारी सुरेंद्र काशीनाथ संखे ( वय 58 वर्ष ) यांना लाच मांगणी करुन स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो ठाणे विभागाने ताब्यात घेतले आहे.

  तक्रारदार यांनी खानिवली गाव, तालुका वाडा येथे सर्वे नं.105 मधील 1 हेक्टर 33 आर ही जमीन खरेदी केली होती त्याबाबत फेरफार नोंद करण्यासाठी लोकसेवक सुरेंद्र संखे (मंडळ अधिकारी) यांनी 30,000/-रूपये लाचेची मांगणी केल्याबाबत तक्रार करण्यात आली त्या अनुषगाने 21/11/2022 रोजी तक्रारदार यांनी लोकसेवक सुरेंद्र संखे यांची कंचाड मधील मंडळ अधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेतली असता. तड़जोड़ी अंती 25,000/- रु रकमेची मांगणी केल्याचे पडताळणी दरण्यान निष्पन्न झाले.

    यात दिनांक 21/11/2022 रोजी कंचाड मंडळ अधिकारी कार्यालय येथे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लोकसेवक यांनी मांगणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम देण्याकरिता भेटले असता लोकसेवक सुरेंद्र संखे यांनी त्यांच्या कैबीन मध्ये 15,000/- रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर बाबत गुन्हा नोंदविण्याची कारवाई वाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी