पाम गावच्या हद्दीत असलेल्या वृदावन नगरीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: चार जण पोलीसाच्या ताब्यात
पाम गावच्या हद्दीत असलेल्या वृदावन नगरीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: चार जण पोलीसाच्या ताब्यात
पालघर : पालघर पोलिस दलाकडून 24/11/2022 रोजी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून जिल्ह्यातील विविध महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावून तसेच कोम्बिग ऑपरेशन राखवून अवैध धंद्यावर कारवाई तसेच गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले.
या नाकाबंदी तसेच कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले त्या नुसार गुप्त माहिती द्वारे पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्याच्या पाम गावाच्या हद्दीतील वृदावन नगरी सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर छापा टाकून चौघांना अटक करण्यात आली आहे. या चारही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी असून त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप आणि १४ मोबाईल जप्त केले आहेत. पालघर जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाम परिसरातील एका इमारतीत संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी या इमारतीची झडती घेतली व गोकुलधाम बिल्डिंग नं 08 मधील फ्लॅट क्र. 103 मध्ये छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाम हद्दीतील वृदावन नगरी सोसायटीतील गोकुलधाम बिल्डिंग मध्ये अग्रीमेंट न करता चार जणाना भाड्या तत्वावर राहण्यासाठी देण्यात आले होते अश्या या ईमारतीत राहून अनधिकृत कॉल सेंटर्समधून इंडियाबुल्स कन्झ्युमर फायनान्स कंपनीकडून कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला जात होता. इंडियाबुल्स कन्झ्युमर फायनान्सचे बनावट कर्ज फॉर्म व्हॉट्सअपद्वारे ग्राहकांना पाठवले जात होते. त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते फोनवर असल्याचे समजले, ते गुगलपे च्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेत होते आणि ग्राहकांना कंपनीचे बनावट पत्र पाठवून कर्ज मिळवण्यासाठी इन्शुरन्स, टीडीएस, जीएसटीच्या नावाखाली फसवणूक करत होते. अटक केलेल्या गुंडांचा सापळा बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणापर्यंत पसरला होता.याबाबत सातपाटी पोलीस ठाणे येथे गु.र.नं -90/2022 भादविस कलम 417, 420, 468, 471, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 65(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि -अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा पालघर हे करीत आहे.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ अपर पोलीस अधीक्षक पालघर, निता पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर, सपोनि प्रेमनाथ ढोले प्रभारी अधिकारी सातपाटी पोलीस ठाणे, पोउपनि मयूरेश अंबाजी, पोना- 439 भारत सानप, पोशि- 51 गणेश व्हसकोटी सर्व नेम सातपाटी पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment