पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालघर – हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. खाडी, नदी व नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी 02525-297474, +918237978873 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 19 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश कार्यालयप्रमुखांना देण्यात आले आहेत. दरम्यान, उद्या (दि. 20 ऑगस्ट) शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करायची की नाही याबाबतचा निर्णय पावसाच्या स्थितीनुसार आ...