बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बोईसर : गणेश नगर परिसरातील साई लोकनगर येथे काल दुपारी झालेल्या घटनेत आयुष अनिल पांडे (वय ११) या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
घरात पाणी भरत असताना मोटार बंद करण्यासाठी तो गेला होता. यावेळी प्लग काढण्याचा प्रयत्न करताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्याच वेळी खाली पाणी साचलेले असल्याने विजेचा प्रवाह वाढला आणि दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आयुष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Post a Comment