Posts

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश

Image
पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश  पालघर : पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस हद्दीत दिनांक 29/03/2023 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 11/04/2023रोजी 24.00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गाणी म्...

रामनवमी निमित्त नवापुर गावात ग्रामस्थानी केली साफ सफाई

Image
रामनवमी निमित्त नवापुर गावात ग्रामस्थानी केली साफ सफाई  पालघर : पालघर तालुक्यातील नवापुर गावातील ग्रामस्थानी रामनवमी निमित्त गावात साफसफाई करण्यात आली. आपण प्रत्येकजण आपल्या घराची स्वच्छता करतो त्याप्रमाणेच,आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे दिनांक 26/03/2023 व 27/03/2023 रोजी असे दोन दिवस दरवर्षी प्रमाणे नवापुर गावात ग्रामस्थानी रामनवमी निमित्त साफसफाई करण्यात आली.नवापुर गावात रामनवमी दिवशी यात्रा उत्साहात साजरी केली जाते यासाठी नवापुर गावात आजू बाजूच्या परिसरातील बरेच लोक गावात येतात त्यामुळे गांव सूंदर आणि स्वच्छ दिसावे या उद्देश्यने गावातील ग्रामस्थानी पुढाकार घेऊन गावात ठीक ठिकाणी तसेच समुद्र किनारी  साफसफाई करण्यात आली. यावेळी गावात साफसफाई केल्यामुळे ग्रामपंचायत चे सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे, ग्रामसेवक राजेश संखे व ग्रामपंचायत सदस्यानी ग्रामस्थानचे कौतुक करून आभार मानले.

पालघर मध्ये एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार

Image
पालघर मध्ये एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार  पालघर  - पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता . मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं .आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली ही शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे . पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत नसल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत . तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी...

तणाशी ग्रामपंचायत मध्ये लाखोचा भ्रष्टाचार : ग्रामस्थाची चौकशीची मांगणी

Image
तणाशी ग्रामपंचायत मध्ये लाखोचा भ्रष्टाचार : ग्रामस्थाची चौकशीची मांगणी पालघर :- डहाणू तालुक्यातील तणाशी ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्तीय व 15 वा वित्तीय आयोग मध्ये सन २०२०/२१ व २०२१/२२ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती द्वारे उघडकीस आले आहे . डहाणू तालुक्यातील तणाशी गावाचे तत्कालीन ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले बाबत जागरूक नागरिकांनी माहिती अधिकार टाकत हि माहिती मिळवली आहे.प्लॉट पाडा स्मशान भूमीचे कोणत्याही प्रकारचे काम केले नसून परंतु ते काम दाखवत लाखों रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. हे माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती द्वारे उघडकीस आले आहे. ग्रामपंचायती मध्ये एकाच वर्षात नऊ  वेळा रंगरंगोटी चे काम  करण्याचा नावाखाली एक लाख २७ हजार रुपयांचे बिल काढण्यात आले आहे.त्यात समाज मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये काढले गेले आहेत. मात्र समाज मंदिर चे प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसल्याचे दिसून येत आहे. टीसीएल पावडर मध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे. २०२०/२१ मध्ये एका वर्षात तीन लाख १६ हजार रुपयांनी खरेदी केली आहे.तर २०...

एम.आय.डी.सी च्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतींचा एल्गार

Image
एम.आय.डी.सी च्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतींचा एल्गार बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भाग हा पाम, कुंभवली, कोलवडे या ग्रामपंचायत हद्दीत येत असून औद्योगिक क्षेत्रातील कारखाना मालकांनी आपला विकास साधत या तीनही गावाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.  याउलट या प्रदुषित कारखान्यांमुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाढते प्रदुषण ही सर्वात मोठी गंभीर समस्येची बाब निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत स्थानीकाना गावात राहण ही कठीण झाले आहे. या सर्व समस्या बाबत पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तारापूरातील औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंताना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. एम.आय.डी.सी अस्तित्वात येऊन 50 वर्ष पूर्ण झाले परंतु आजही उद्योगासाठी बेसीक इंफ्रास्ट्रक्चर बनवू शकले नाही त्यामुळे एम.आय.डी.सी तील उद्योजक केमिकल माफियांना हाताशी धरून नैसर्गीक नाल्यात बारमाही हजारों लीटर रासायनिक पाणी सोडण्यात येते त्यामुळे येथील सुपीक शेती नापीक झाली आहे. त्यावर कोणतीही लागवड करू शकत नाही व केमिकल युक्त पाण्यामुळ...

प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर केला सामुहिक बलात्कार

Image
प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर केला सामुहिक बलात्कार पालघर :  पालघर जिल्ह्यातील विरार भागात २० वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह जवळच्या डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. आरोपींनी त्यांना पाहिलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी आणि तरुणामध्ये वाद झाला. तरुणाने बिअरच्या मोकळ्या बाटलीने दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर आरोपींनी तरुणाचेही कपडे फाडले आणि त्याला झाडाला बांधलं असं पोलिसांनी सांगितलं. यानंतर आरोपींनी तरुणीला ओढत एका निर्जनस्थळी नेलं आणि बलात्कार केला. आरोपींनी यावेळी पीडित तरुणीची पर्स जाळून टाकली असं पोलिसांनी सांगितलं. पीडित तरुणीने आरोपींच्या तावडीतून पळ काढत घर गाठलं होतं. तर तरुण मात्र झाडाला बांधलेल्या अवस्थेतच होता. तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठड...

बोईसर मधील बजाज हेल्थकेअर ली. कंपनीस भीषण आग : एका युवकाचा मृत्यु

Image
बोईसर मधील बजाज हेल्थकेअर ली. कंपनीस भीषण आग : एका युवकाचा  मृत्यु कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजून एक निष्पाप जीवाचा बळी बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर ली. हा कारखाना नेहमीच प्रदुषणा बाबतीत चर्चे चा विषय राहिला आहे तर प्रत्येक कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही अटी व शर्तीच्या आधारावर ठराविक उत्पादनाची परवानगी (कसेंट) दिली जाते. परंतु कारखानदार जास्तीच्या नफेखोरीच्या लालसेपोटी परवानगी नसलेले बेकायदेशीर उत्पादन घेत पर्यावरणाची हानी करत निष्पाप कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक इ -६२/६३ बजाज हेल्थकेअर ली. (वेटफार्मा प्रोडक्ट इं. ली.) या कारखान्यात काल सकाळी ६ वाजून २० मिनिटाच्या सुमारास ६००० किलो लिटर क्षमता असलेल्या ग्लास लाईन वेसल मधे आग लागून त्या आगीच्या भडक्यात होरपळून कंत्राटी पद्धतीवर काम करणारा २८ वर्षीय नागेंद्र गौतम नावाचा युवक गंभीर जखमी झाला होता परंतु आज उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्लॉट क्रमांक इ ६३ मधे Glycine नावा...