Posts

Showing posts from November, 2024

लुपिन फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

Image
लुपिन फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन   बोईसर : लुपिन फाउंडेशन व ग्रामपंचायत पाम यांच्या संयुक्त विद्यमाने पाम गावामध्ये जागतिक COPD दिनानिम्मित दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  लुपिन फाऊंडेशन ही संस्था ३६ वर्षापासून कार्यरत आहे या  सस्थे अंतर्गत वेगवेगळे समाज कार्य करत असतात. कोरोना, प्रदूषणामुळे तसेच जीवनशैली मुळे लोकांना फुफ्फुसाचे आजार व हृदयरोगाचे आजार वाढत चालले आहे त्यामूळे या कॅम्प मार्फत चेकअप करून हे उपक्रम सरकार मार्फत राबविले जातात आणि त्यासाठी लुपिन फाऊंदेशन मार्फत व्हन (गाडी) ठेवण्यात आलेली आहे ज्यात सर्व सुविधा दिल्या जातात. जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे ही गाडी नेहमी फिरत असते यात डॉक्टर असुन उपचार मोफत दिला जातो. तसेच ही गाडी ९ आरोग्य केंद्रात जाते आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा तसेच फुफ्फुसाचा आणि हृदयरोगाचा उपचार मोफत दिला जाईल आणि असे उपक्रम पूढे राबविले जाईल असे नचिकेत सुळे (लुपिन फाऊंडेशनचे आरोग्य हेड) यांनी सांगितले.  यावेळी सदर आरोग्य शिबीरात लुपिन...

बोईसर येथील रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्याच्या गोडाऊनला लागली भीषण आग

Image
बोईसर येथील रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कारखान्याच्या गोडाऊनला लागली भीषण आग  बोईसर : बेटेगाव येथील प्लास्टिक उत्पादनांसह दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. बोईसर पूर्वेकडील बेटेगाव - महागाव रस्त्यावरील एका प्लास्टिक उत्पादन तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचवून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास घडली या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघर नगरपरिषद यांच्या एकूण चार बंबानी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.  गोदाउनला लागलेल्या आगीमुळे साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरल...

डहाणूत बविआला भाजपचा मोठा धक्का ; बविआचा उमेदवार सुरेश पाडवी भाजपमध्ये दाखल

Image
डहाणूत बविआला भाजपचा मोठा धक्का ; बविआचा  उमेदवार सुरेश पाडवी भाजपमध्ये दाखल  पालघर - मतदानाच्या एक दिवस आधी बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये पालघर चे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पाडवी यांचा पक्ष प्रवेश केला आहे.काही दिवसांपूर्वीच पाडवी यांनी भाजप मधून बहुजन विकास आघाडीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. ◾पाडवी यांचा इतिहास आणि राजकीय भूमिका सुरेश पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष होते आणि डहाणू मतदारसंघात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रचार केला...

महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

Image
महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका विलास तरे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे या कॉमन मॅनला सुपर मॅन करा - एकनाथ शिंदे  पालघर: महायुतीच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावीत, बोईसरच विधानसभेचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारार्थ पालघर व मनोर येथे एकनाथ शिंदे यांची मंगळवारी जाहीर सभा झाली. लाडकी बहीण योजनेला नावे ठेवणारे, बहिणींना भीक देणारे सरकार अशी योजनेची हेटाळणी करणा-या महाविकास आघाडीने योजनेची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यानंतर या योजनेचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. विरोधकांची ही योजना चोर महाआघाडी आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे मंगळवारी केली. महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री आहे, असेही शिंदे म्हणाले. महायुतीच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावीत, बोईसरच विधानसभेचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारार्थ पालघर व मनोर येथे एकनाथ शिंदे यांची मंगळवारी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.  सत्तेच्या अडीच वर्षांच्या कालावधीत काय केले हे सांगण्यासाठी महाविकास आघाडीकडे क...

कुणबी सेना संघटनेच्या बदलत्या भूमिकेमुळे काही घटक नाराज

Image
कुणबी सेना संघटनेच्या बदलत्या भूमिकेमुळे काही घटक नाराज  पालघर : गेल्या सात वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या कुणबी सेनेने  अचानक बहुजन विकास आघाडीला साथ देण्याची घोषणा केली होती. कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले होते. मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 तारखेला पालघर जिल्हा दौरा असण्याच्या अवघ्या काही तास आधी कुणबी सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं . कुणबी सेनेच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे सध्या पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजच संभ्रमात अवस्थेत असल्याचा पाहायला मिळतंय. मागील अनेक वर्षांपासून कुणबी सेनेचा महायुतीला पाठिंबा होता . मात्र निवडणुकीच्या तोंडावर कुणबी सेना या संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी महायुतीला दिलेला पाठिंबा काढत इतरांप्रमाणे महायुतीने देखील आमचा राजकीय वापर केलाचा घनघाती आरोप केला . शेतकऱ्यांचे प्रश्न, पेसाभरती यासह जिल्ह्यातील विविध मागण्यांवर आक्रमक होत कुणबी सेना या संघटनेने महायुतीचा पाठिंबा काढला. निवडणूक जाहीर होताच आपल्या काही पदाधिक...

बोईसर मध्ये विलास तरेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Image
बोईसर मध्ये विलास तरेचे जोरदार शक्ती प्रदर्शन   बोईसर : बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असे चित्र दिसुन येत असून महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे ह्यांच्या प्रचाराचा श्रीफळ फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रचाराला सुरवात करण्यात आली प्रचारामध्ये बोईसर विधानसभेतील बरीचशी गावे पिंजून काढण्यात आली आहेत.  बोईसर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व राहिला आहे. २००९ साली बोईसर विधानसभा गट निर्माण होऊन बहुजन विकास आघाडीकडून संधी मिळालेल्या विलास तरे यांनी झेंडा फडकवला होता. २०१४ साली देखील विलास तरेच विजयी झाले होते. मात्र २०१९ साली विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. परंतु युती धर्म न पाळल्यामुळे बंडखोर उमेदवारांनी तरे यांची मत खाऊन  बविआचे राजेश पाटील यांना अवघ्या काही मतांनी विजयी होण्यास मार्ग सुकर केला होता. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पालघर व बोईसर विधानसभेची जागा ही शिवसेना गटाला गेल्याने बोईसर विधासभेकरीता विलास तरे यांना उमेदवारी ...

राजेश पाटील यांचा प्रचार शुंभारंभ व जाहीर सभा

Image
राजेश पाटील यांचा प्रचार शुंभारंभ व जाहीर सभा  पालघर : १३१ बोईसर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीची भव्य बैठक देवभूमी सफाळे येथे पार पडली. श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतीमेसमोर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.  या बैठकीला आमदार राजेश पाटील यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष  राजीव (नाना) पाटील, प्रविण (दादा) राऊत, सुरेश तरे, तालुका अध्यक्ष, प्रमुख नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी राजीव नाना व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिले. व आपल्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा एकदा शिटी निशाणी आपल्याला मिळाली हा आपला पहिला विजय असल्याचे सांगितले.  बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात  त्यांनी केलेली विकासकामे, ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत. या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात. रस्ते, स्मशानभूमी, समाज मंदिरे, पाणीपुरवठा, साकव, पू...

जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात बुडून दोन युवकाचा मृत्यु

Image
जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात बुडून दोन युवकाचा मृत्यु  पालघर : जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बोईसरमधून पर्यटनासाठी गेलेल्या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी जव्हारच्या काळमांडवी येथील धबधब्यावर पर्यटनासाठी बोईसरवरून पाच तरुण फिरण्यासाठी गेले होते, त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असून दोघाही तरुणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. अखिलेश रामदेव मिश्रा (27) आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक (31) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे असून ते बोईसर मधील रहिवासी आहेत. दरम्यान, जव्हारचा काळमांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून दरवर्षी या धबधब्याच्या प्रवाहात बुडून काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, येथील पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना अगोदरच प्रशासनाकडून सतर्क केले जाते.