जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात बुडून दोन युवकाचा मृत्यु
जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात बुडून दोन युवकाचा मृत्यु
पालघर : जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बोईसरमधून पर्यटनासाठी गेलेल्या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी जव्हारच्या काळमांडवी येथील धबधब्यावर पर्यटनासाठी बोईसरवरून पाच तरुण फिरण्यासाठी गेले होते, त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असून दोघाही तरुणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. अखिलेश रामदेव मिश्रा (27) आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक (31) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे असून ते बोईसर मधील रहिवासी आहेत. दरम्यान, जव्हारचा काळमांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून दरवर्षी या धबधब्याच्या प्रवाहात बुडून काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, येथील पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना अगोदरच प्रशासनाकडून सतर्क केले जाते.
Comments
Post a Comment