लुपिन फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
लुपिन फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
बोईसर : लुपिन फाउंडेशन व ग्रामपंचायत पाम यांच्या संयुक्त विद्यमाने पाम गावामध्ये जागतिक COPD दिनानिम्मित दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लुपिन फाऊंडेशन ही संस्था ३६ वर्षापासून कार्यरत आहे या सस्थे अंतर्गत वेगवेगळे समाज कार्य करत असतात. कोरोना, प्रदूषणामुळे तसेच जीवनशैली मुळे लोकांना फुफ्फुसाचे आजार व हृदयरोगाचे आजार वाढत चालले आहे त्यामूळे या कॅम्प मार्फत चेकअप करून हे उपक्रम सरकार मार्फत राबविले जातात आणि त्यासाठी लुपिन फाऊंदेशन मार्फत व्हन (गाडी) ठेवण्यात आलेली आहे ज्यात सर्व सुविधा दिल्या जातात. जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे ही गाडी नेहमी फिरत असते यात डॉक्टर असुन उपचार मोफत दिला जातो. तसेच ही गाडी ९ आरोग्य केंद्रात जाते आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा तसेच फुफ्फुसाचा आणि हृदयरोगाचा उपचार मोफत दिला जाईल आणि असे उपक्रम पूढे राबविले जाईल असे नचिकेत सुळे (लुपिन फाऊंडेशनचे आरोग्य हेड) यांनी सांगितले.
यावेळी सदर आरोग्य शिबीरात लुपिन सीएसआर प्रमुख कु. तुषारा शंकर, महेश काटे (एचआर हेड, ल्युपिन लि. तारापूर), डॉ. नचिकेत सुळे (हेड, लुपिन लिव्ह्स प्रोग्राम ), दर्शना पिंपळे सरपंच, मनोज पिंपळे उप सरपंच, अरविंद संखे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाम हायस्कूलचे शिक्षक सचिन संखे यांनी केले.
या शिबिरामध्ये मुख्यतः ३० वर्षा वरील महिला व पुरुषांना फुफ्फूसाचे आजार व हृदयरोग निदान याबाबत शिबिर घेण्यात आले. सदर शिबीरात पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अपर्णा बिराजदार आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. नरेश मुनोत या तज्ञ डॉक्टरांचे मार्फत शिबिरामधील व्यक्तींची तपासणी करून त्यांना सल्ला देण्यात आला.
सदर शिबिरात विविध आजारांनीग्रस्त असलेल्या नागरिकांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. त्याचबरोबर शिबिरात सर्वांगीण काळजी सुनिश्चित करून, स्पायरोमेट्री, ईसीजी आणि पॅथॉलॉजी चाचणीसह महत्त्वपूर्ण निदान सेवा देण्यात आल्या. सदर शिबिराचा एकूण १६० हुन अधिक लोकांनी लाभ घेतला. या उपक्रमाने सामुदायिक आरोग्य आणि COPD बद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दृढ वचनबद्धता दर्शवली.
Comments
Post a Comment