कुणबी सेना संघटनेच्या बदलत्या भूमिकेमुळे काही घटक नाराज
कुणबी सेना संघटनेच्या बदलत्या भूमिकेमुळे काही घटक नाराज
पालघर : गेल्या सात वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या कुणबी सेनेने अचानक बहुजन विकास आघाडीला साथ देण्याची घोषणा केली होती. कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले होते. मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 तारखेला पालघर जिल्हा दौरा असण्याच्या अवघ्या काही तास आधी कुणबी सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं .
कुणबी सेनेच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे सध्या पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजच संभ्रमात अवस्थेत असल्याचा पाहायला मिळतंय. मागील अनेक वर्षांपासून कुणबी सेनेचा महायुतीला पाठिंबा होता . मात्र निवडणुकीच्या तोंडावर कुणबी सेना या संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी महायुतीला दिलेला पाठिंबा काढत इतरांप्रमाणे महायुतीने देखील आमचा राजकीय वापर केलाचा घनघाती आरोप केला . शेतकऱ्यांचे प्रश्न, पेसाभरती यासह जिल्ह्यातील विविध मागण्यांवर आक्रमक होत कुणबी सेना या संघटनेने महायुतीचा पाठिंबा काढला.
निवडणूक जाहीर होताच आपल्या काही पदाधिकाऱ्यां सह कुणबी सेना संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला . 17 संवर्गातील पेसाभरतीला राज्य सरकारने आमदारांच्या मंत्रालयातील जाळ्यांवरील आंदोलनानंतर परवानगी दिली . त्यानंतर पालघर जिल्ह्यात बहुतांशी असलेल्या कुणबी समाजाकडून या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. सरकार आणि आंदोलन करणाऱ्या आमदारां विरोधात भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी कुणबी समाजाच्या काही समाज माध्यमांवर समोर आल्या . मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 तारखेला पालघर जिल्हा दौरा असण्याच्या अवघ्या काही तास आधी कुणबी सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं . त्यामुळे कुणबी सेना ही संघटना सतत आपली भूमिका बदलत असल्याचे सांगत कुणबी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली . अवघ्या पंधरा ते वीस दिवसात कुणबी सेना या संघटनेने सतत आपली भूमिका बदलल्याने कुणबी समाजातील काही घटक देखील नाराज असल्याचं सांगण्यात येतंय.
Comments
Post a Comment