राजेश पाटील यांचा प्रचार शुंभारंभ व जाहीर सभा

राजेश पाटील यांचा प्रचार शुंभारंभ व जाहीर सभा 


पालघर : १३१ बोईसर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीची भव्य बैठक देवभूमी सफाळे येथे पार पडली. श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतीमेसमोर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. 

या बैठकीला आमदार राजेश पाटील यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष  राजीव (नाना) पाटील, प्रविण (दादा) राऊत, सुरेश तरे, तालुका अध्यक्ष, प्रमुख नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजीव नाना व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिले. व आपल्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा एकदा शिटी निशाणी आपल्याला मिळाली हा आपला पहिला विजय असल्याचे सांगितले. 


बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात  त्यांनी केलेली विकासकामे, ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत. या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात. रस्ते, स्मशानभूमी, समाज मंदिरे, पाणीपुरवठा, साकव, पूल, वसतीगृहे इमारती व अन्य पायाभूत सुविधा विकास कामावर खर्च केला. त्यांनी केलेल्या विकासकामामुळे बोईसरच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदलला गेला. मेरिटाईम बोर्ड, जलजीवन मिशन, पर्यटन,भौतिक पायाभूत सुविधा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम, सार्व.बांधकाम विभाग, डोंगरी विकास,आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडे आ.राजेश पाटील यांनी आर्थिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व तो मिळवून अनेक विकासकामे मार्गी लावली. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, समाज मंदिरे बांधली तसेच विविध सरकारी योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली. 

त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला कौल देत पक्ष श्रेष्ठींनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा पुन्हा एकदा राजेश पाटील या कर्तव्य तत्पर आमदारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे व आपल्या मतदारसंघातील विकासासाठी पालघर जिल्ह्यातील आपले स्थान बळकट करायचे आहे अशी प्रतिज्ञा घेत कार्यकर्ते नवी ऊमेद व ऊत्साहासह आप आपापल्या मतदार विभागात गेले असल्याचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी