महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
विलास तरे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे या कॉमन मॅनला सुपर मॅन करा - एकनाथ शिंदे
पालघर: महायुतीच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावीत, बोईसरच विधानसभेचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारार्थ पालघर व मनोर येथे एकनाथ शिंदे यांची मंगळवारी जाहीर सभा झाली.
लाडकी बहीण योजनेला नावे ठेवणारे, बहिणींना भीक देणारे सरकार अशी योजनेची हेटाळणी करणा-या महाविकास आघाडीने योजनेची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यानंतर या योजनेचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. विरोधकांची ही योजना चोर महाआघाडी आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे मंगळवारी केली. महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री आहे, असेही शिंदे म्हणाले. महायुतीच्या पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावीत, बोईसरच विधानसभेचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारार्थ पालघर व मनोर येथे एकनाथ शिंदे यांची मंगळवारी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सत्तेच्या अडीच वर्षांच्या कालावधीत काय केले हे सांगण्यासाठी महाविकास आघाडीकडे काहीच नाही. त्यांनी काय केले हे समोर येऊन सांगावे असे आव्हानही शिंदे यांनी दिले. लाडकी बहिण भाऊ, भावांबरोबरच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी, आशा सेविका अशा सर्व घटकांसाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून जनहिताचे निर्णय महायुतीने घेतले. अनेक योजनांचा निधी वाढविला. लाडकी बहीण योजना लोकप्रिय होण्यास सुरूवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सावत्र भावांकडून झाला. बहीणींना भीक देताय का, अशी हेटाळणी करण्यात आली. सत्तेत आल्यानंतर योजनेची चौकशी केली जाईल. दोषींना तुरूंगात टाकले जाईल, असेही सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. लाडक्या बहीणसाठी भाउ शंभर वेळा तुरूंगात जाण्यासाठी तयारी आहे. मात्र, बहीणी सुज्ञ आहेत’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले
ते म्हणाले की, महायुतीचे सरकार देणारे आहे. घेणारे नाही. रेवड्यांचे सरकार अशी टीका सरकारवर झाली. मात्र, महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या आणि त्याच समावेश जाहीरनाम्यात केला. तीन हजार रूपये देतो अशी घोषणा केली. कर्नाटक, हिमचल प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे जागरूक राहून महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावायचे आहेत.
◾ एकनाथ शिंदे विलास तरे बद्दल काय म्हणाले
आपल सरकार जनतेच लाडक सरकार आहे. जनतेच्या मनातलं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणूनच महायुतीचे उमेदवार विलास तरे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणुन त्यांनी जिल्हा परिषदेतून काम केलं त्यामुळे त्यांना या भागाच्या समस्याची जाणं आहे ग्रामीण भागात काय पाहिजे काय नाही कुठ कुठली विकास कामे करायची राहिलीत हे त्यांना माहिती आहे विलास तरे हा सर्व सामान्य कुटुंबातला कार्यकर्ते आहे म्हणुन ते जमिनीवरून चालतात हवेत उडत नाही सर्व सामान्य आहे तुमच्यातला आहे तुमच्या परिवारातला आहे त्यामुळे त्याला आपल्याला मोठं करायच आहे कॉमन मॅन ला सुपर मॅन करायच आहे कारण ते गोरगरीब लोकांच्या पाठीशी विलास तरे ऊभे राहतात. पुढाकार घेतात तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे या वेळी त्यांचा विजय यावेळी नक्की आहे. कार्यकर्ता घरात नाही तर दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे त्यामूळे तरे लोकांच्या दारात जातो व त्यांच्या समस्या ऐकतो व सोडवतो.
◾देशातला पहिला आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि जे काँग्रेस च्या पन्नास वर्षात काम झाले नाही ते काम या महायुतीने अडीज वर्षात केले.औद्योगिक क्षेत्र वाढवून भूमिपुत्रांना रोजगार देणार. तसेच बाजूला असलेले धर्मांतर झालेले उमेदवार आपल्या समोर विलास तरे नावाचं आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक भूमिपुत्र उभा आहे - विलास तरे
◾धर्मांतर केलेला उमेदवार म्हणजे विश्र्वास वळवी आणि चार गुंड एकत्र येऊन एक पक्ष तयार केले ते म्हणजे बहुजन विकास आघाडी त्यामुळे विलास तरे याला निवडून द्या - प्रभाकर राऊळ
◾महायुती एक कुटुंब आहे आणि २० तारखेला लग्न आहे पत्रिका वाटप झालेल्या आहेत तसेच बोईसर व पालघर विधानसभेत महायुती एक नंबर वर आहे. - मनीषाताई निमकर
Comments
Post a Comment