Posts

सगीता कारखान्याचा घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडण्याचा प्रकार उघडकीस

Image
सगीता कारखान्याचा घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडण्याचा प्रकार उघडकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई   बोईसर – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १ चे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे व क्षेत्रीय अधिकारी विश्वजीत सोरगे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली. कारखाना M/s Sagitta Private Limited प्लॉट नंबर एन ३,४ या उद्योगाने घातक रासायनिक पाणी खुलेआम पाईपद्वारे नद्यात सोडत असल्याचे रंगेहाथ पकडले आहे. तारापूरच्या या कारखान्याच्या मागील भागात घनदाट जंगल आहे, आणि शेती मालकांनी जेसीबी मशीनने काटेरी झुडपे काढल्यावर हा गंभीर प्रदूषण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनवर कळविण्यात आले, आणि त्यानुसार तात्काळ चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. या घातक रासायनिक पाण्याचे pH दोन आणि TDS १०,००० च्या वर आहे, ज्यामध्ये ३५,००० ते ४०,००० हाय सीओडी असल्याचा शोध लागला आहे. हे पाणी पाईपद्वारे नदीत सोडले जात आहे, आणि यामुळे कुंभवली, पाम, आणि कोलवडे गावांतील पाणी दूषित होण्याची आणि भविष्यात पास्थळ गावासारखी परिस्थिती निर्मा...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Image
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 13 व 14 फेब्रुवारी 2025 रोजी पद्मश्री जिव्या सोमा म्हशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील वाणगांव, पालघर, वसई, तलासरी, डोंगारी, जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड येथील संस्थांतील मुलं व मुली सहभागी झाली. स्पर्धेत सांघिक खेळांमध्ये क्रिकेट (मुलं/मुली), कबड्डी (मुलं/मुली), खो-खो (मुलं/मुली), हॉलीबॉल (मुले) आणि वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, 100 मीटर व 400 मीटर धावणे, तसेच लांब उडी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार दयानंद सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व खेळांसाठी ट्रॉफी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघरचे प्रभारी प्राचार्य उमाकांत लोखंडे यांनी प्रायोजित केल्या. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंच्या संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था अजित राणे कॅम्लीन कोकोयू लिमिटेड बोईसर यांनी केली, तर शुद...

पालघर जिल्ह्यात रस्ते कामांतील गैरव्यवहार, शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल

Image
पालघर जिल्ह्यात रस्ते कामांतील गैरव्यवहार, शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल पालघर : पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांच्याविरोधात विक्रमगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी विक्रमगड तालुक्यातील रस्ते कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानुसार, पंडित यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. विवेक पंडित यांच्या आरोपांनुसार, रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आला आहे. पंडित यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. विक्रमगड तालुक्यात जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेत असताना पंडित यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप केला. त्यानंतर, पंडित यांनी रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता विष्णु बोरसे आणि शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रांचा वापर ...

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा सज्ज

Image
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा सज्ज डहाणू : डहाणू उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी, गंभीर जखमी रुग्णांना आणि इतर आजारांवर उपचार घेणाऱ्यांना सिटीस्कॅन सेवा घेण्यासाठी वापी किंवा पालघर जावे लागायचे. पण आता डहाणूतील रुग्णालयातच ही अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. डहाणू तालुक्यात आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक गंभीर समस्या होत्या, कारण येथील शासकीय रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ञ डॉक्टरांची कमी होती. परिणामी, रुग्णांना गुजरातच्या रुग्णालयात उपचारासाठी जावे लागायचे. यावर आता समाधान मिळाले आहे. 9 फेब्रुवारी रोजी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार निकोले यांनी सांगितले की, "या रुग्णालयाची क्षमता लवकरच शंभर खाटांवरून 200 बेडपर्यंत वाढवली जाईल. येथील रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचारांची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्र...

बोईसर पूर्व परिसरात बेकायदा उत्खनन, खदानी नियमांचे उल्लंघन

Image
बोईसर पूर्व परिसरात बेकायदा उत्खनन ; खदानी नियमांचे उल्लंघन बोईसर पूर्व परिसरात दगड खदानींमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन सुरू आहे. अनेक खदानी २०० फूटापेक्षा अधिक खोलीपर्यंत गेले असून, यामुळे परिसरातील पाणीटंचाई वाढली आहे. लालोंडे, नागझरी, गुंदले आणि निहे भागांमध्ये हे उत्खनन होत असून, यासाठी योग्य नियमांचे पालन न करता खदानी खोदले जात आहेत. खदानींमध्ये साचलेले पाणी उपसून बाहेर टाकले जात असल्याने, आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उत्खनन करताना सहा मीटर लांबी व उंचीच्या पायऱ्यांचे पालन न करता २०० ते २५० फूट खोलीपर्यंत सरळ उत्खनन केले जात आहे. यामुळे जमिनीवर पोहोचण्यासाठी पोकलँड आणि डंपरच्या वाहनांना २० ते २२ मिनिटांचा अवधी लागत आहे. अनेक खदानी लोकवस्तीपासून १५०-२०० फूट अंतरावर आहेत, त्यामुळे स्फोटामुळे घरांना हादरे बसत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने अनेक तक्रारी केल्या असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. दुसरीकडे, खदानींमध्ये साचलेले पाणी फेकल्यामुळे शेतजमिनीत आणि बागायतींमध्ये मोठे नुकसान होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा गंभ...

बोईसरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची MD ड्रग्स तस्करावर मोठी कारवाई

Image
बोईसरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची MD ड्रग्स तस्करावर मोठी कारवाई पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील कलर सिटी संकुलामध्ये एका फ्लॅटमध्ये MD ड्रग्स असल्याची माहिती  मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता स्थानिक गुन्हे शाखेने  बोईसर येथील कलर सिटी संकुलातील बिल्डिंग नंबर १७ मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये छापा टाकला आणि आमान मुराद नावाच्या आरोपीला रंगेहात पकडले. मुराद हा वसई परिसराचा रहिवासी असून, बोईसरमध्ये अवैध धंदा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्याकडे सुमारे १ किलो २०० ग्रॅम MD ड्रग्स ची पावडर सापडली, त्याची बाजारामध्ये अंदाजे ३ कोटी रुपयांची किंमत आहे. याची मुळ किंमत अंदाज २ कोटी ४० लाख रुपये आहे. सदर आरोपी आमान मुराद याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी अंती ह्या गुन्ह्यांमध्ये आणखीन किती लोकांचा समावेश असून या तस्करीतील संपूर्ण नेटवर्क उघड होऊ शकते.

जंगलात शिकारीसाठी गेलेल्या टोळीने शिकार समजुन आपल्या साथीदारावरच झाडली गोळी

Image
जंगलात शिकारीसाठी गेलेल्या टोळीने शिकार समजुन आपल्या साथीदारावरच झाडली गोळी  पालघर : पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यातील आलन डोंगराच्या घनदाट जंगलात एक धक्कादायक घटना घडली आहे. मौनी अमावस्येच्या रात्री शिकारीसाठी जंगलात गेलेल्या एका टोळीने शिकार समजून आपल्याच साथीदारावर गोळी झाडली. या गोळीने ६० वर्षीय रमेश वरठा यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह जंगलातच टाकून शिकारी टोळीचे सदस्य पसार झाले. २९ जानेवारी रोजी बोरशेती, किराट आणि रावते गावांतील १२ जण शिकारीसाठी जंगलात गेले होते. जंगलातील आंब्याच्या पाण्यावर रानडुकरे आणि पट्टेदार वाघ येत असल्याने तेथे शिकारी लपून बसले होते. रमेश वरठा हे उशिरा पोहोचले आणि आवाज न करता चालत असताना पाय पालापाचोळ्यावर पडला, त्यावरून सागर हाडळ या शिकाऱ्याने त्यांना शिकार समजून गावठी बनावटीच्या काडतुसी बंदुकीने एक फैरी झाडली. त्यातून निघालेले छरें रमेश वरठा यांना लागले आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ते पाहून आरोपी सागर हाडळ आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांचे प्रेत बाजूलाच झाडीत टाकून दिले आणि ते तिथून पसार झाले होते. त्यांनी सदर घटना इतर कोणालाही सांगितली न...