सगीता कारखान्याचा घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडण्याचा प्रकार उघडकीस

सगीता कारखान्याचा घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडण्याचा प्रकार उघडकीस

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 



बोईसर – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १ चे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे व क्षेत्रीय अधिकारी विश्वजीत सोरगे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली. कारखाना M/s Sagitta Private Limited प्लॉट नंबर एन ३,४ या उद्योगाने घातक रासायनिक पाणी खुलेआम पाईपद्वारे नद्यात सोडत असल्याचे रंगेहाथ पकडले आहे.


तारापूरच्या या कारखान्याच्या मागील भागात घनदाट जंगल आहे, आणि शेती मालकांनी जेसीबी मशीनने काटेरी झुडपे काढल्यावर हा गंभीर प्रदूषण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनवर कळविण्यात आले, आणि त्यानुसार तात्काळ चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. या घातक रासायनिक पाण्याचे pH दोन आणि TDS १०,००० च्या वर आहे, ज्यामध्ये ३५,००० ते ४०,००० हाय सीओडी असल्याचा शोध लागला आहे. हे पाणी पाईपद्वारे नदीत सोडले जात आहे, आणि यामुळे कुंभवली, पाम, आणि कोलवडे गावांतील पाणी दूषित होण्याची आणि भविष्यात पास्थळ गावासारखी परिस्थिती निर्माण होण्याची गंभीर शक्यता आहे.

M/s Sagitta private limited  हा कारखाना जेएलडी असून या कारखानाकडून दिवसाढवळ्या शेतीपूरक जमिनीवर पाईप पुरवून उत्पादन दरम्यान निर्माण होणारा घातक रासायनिक पाणी सोडत असल्याचे निदर्शनास आलेले असून हा संपूर्ण घातक रासायनिक पाणी लगतच्या नैसर्गिक ओहळात साठलेला आहे यामुळे कुंभवली, पाम, गावातील कुपनलिकेचा पाणी दुषित होऊन पास्थळ गावासारखी परिस्थिती होण्याच्या मार्गावर आहे.


दरम्यान प्रदुषित कारखाना विरोधात पुढील कार्यवाही करता तारापूर येथील प्रदूषण विभागाकडून नेहमीच अहवाल सादर केले जाते मात्र कारखाना मालक वरिष्ठ कार्यालयास पटविण्यास माहिर असल्यामुळे पुढील कार्यवाहीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे कारखानदार पुन्हा पुन्हा आपला घातक रासायन खुलेआम विल्हेवाट लावण्याचा धाडस करत असल्याचे गंभीर आरोप येथील नागरिक केले असून या प्रकाराने नजीकच्या गावांच्या जलस्रोतांना धोका पोहोचविला आहे.


◾सदर कारखाना घातक रासायनिक पाणी मागिल बाजूस पाईप पुरवून विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास आलेले असून दोन पीएच असलेला हा घातक रासायनिक पाणी आहे. पुढील कार्यवाही करता वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे : राजू वसावे - उपप्रादेशिक अधिकारी, म प्र नि मंडळ तारापूर १ 

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक