शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न


पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 13 व 14 फेब्रुवारी 2025 रोजी पद्मश्री जिव्या सोमा म्हशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील वाणगांव, पालघर, वसई, तलासरी, डोंगारी, जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड येथील संस्थांतील मुलं व मुली सहभागी झाली.


स्पर्धेत सांघिक खेळांमध्ये क्रिकेट (मुलं/मुली), कबड्डी (मुलं/मुली), खो-खो (मुलं/मुली), हॉलीबॉल (मुले) आणि वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, 100 मीटर व 400 मीटर धावणे, तसेच लांब उडी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार दयानंद सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व खेळांसाठी ट्रॉफी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघरचे प्रभारी प्राचार्य उमाकांत लोखंडे यांनी प्रायोजित केल्या.


स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंच्या संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था अजित राणे कॅम्लीन कोकोयू लिमिटेड बोईसर यांनी केली, तर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संध्या पाटील निआन फाउंडेशन लिमिटेड पालघर यांनी केली.


विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी समारोप कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. समारोप सोहळ्यात संस्थेचे प्राचार्य  संजय भोई, तलासरी संस्थेच्या प्राचार्या शामली पाटील, पालघर संस्थेचे प्रभारी प्राचार्य उमाकांत लोखंडे आणि वाणगांव संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंदन बंजारा उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव भोईर यांनी केले, तर खेळाचे साहित्य सोमा बेंडकोळी व प्रशांत पिंपळे यांनी उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उदय गुजर, प्रशांत बोकंद आणि सुप्रिया चुरी यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक