बोईसरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची MD ड्रग्स तस्करावर मोठी कारवाई
बोईसरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची MD ड्रग्स तस्करावर मोठी कारवाई
पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील कलर सिटी संकुलामध्ये एका फ्लॅटमध्ये MD ड्रग्स असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर येथील कलर सिटी संकुलातील बिल्डिंग नंबर १७ मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये छापा टाकला आणि आमान मुराद नावाच्या आरोपीला रंगेहात पकडले. मुराद हा वसई परिसराचा रहिवासी असून, बोईसरमध्ये अवैध धंदा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्याकडे सुमारे १ किलो २०० ग्रॅम MD ड्रग्स ची पावडर सापडली, त्याची बाजारामध्ये अंदाजे ३ कोटी रुपयांची किंमत आहे. याची मुळ किंमत अंदाज २ कोटी ४० लाख रुपये आहे.
सदर आरोपी आमान मुराद याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी अंती ह्या गुन्ह्यांमध्ये आणखीन किती लोकांचा समावेश असून या तस्करीतील संपूर्ण नेटवर्क उघड होऊ शकते.
Comments
Post a Comment