शिवशक्ती संघटनेच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे बोईसरमधील वीजपुरवठा सुरळीत
शिवशक्ती संघटनेच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे बोईसरमधील वीजपुरवठा सुरळीत
महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला समाधान
बोईसर– बोईसरमधील महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील मुख्य विद्युत ट्रान्स्फॉर्मर अचानक निकामी झाल्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना अंधारात दिवस-रात्र काढावी लागण्याची वेळ येत होती. या त्रासातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी शिवशक्ती संघटनेने पुढाकार घेतला.
शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या
नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या बोईसर कार्यालयाशी संपर्क साधून समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला महावितरणकडून "उद्या ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून दिला जाईल," असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.
तथापि, संघटनेच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तत्काळ पावले उचलावी लागली. केवळ काही तासांतच नविन ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला आणि दोन्ही परिसरांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
या वेगवान आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे परिसरातील
नागरिकांनी शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, "वीज गेल्यानंतर आम्हाला कोणतीच आशा उरलेली नव्हती. मात्र संजय पाटील सरांनी त्वरित लक्ष घातल्यामुळे आमचा अंधार दूर झाला."
या घटनेमुळे शिवशक्ती संघटनेची कार्यक्षमता, तातडीची प्रतिक्रिया देण्याची तयारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये संघटनेबाबत विश्वासाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment