लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पुढाकाराने हिरवळीचा उपक्रम

 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पुढाकाराने हिरवळीचा उपक्रम

"पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे!" – वृक्षारोपण उपक्रमाने पथराळीत उमलली हरितजागरूकता



बोईसर :
"पर्यावरण वाचवा, पृथ्वी सजवा – एक वृक्ष लावा, भविष्य घडवा" या प्रेरणादायी संदेशाने समृद्ध असा वृक्षारोपण उपक्रम लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,  पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने (दि .४) ग्रामपंचायत पथराळी येथे उत्साहात पार पडला. समाजाभिमुख दृष्टिकोनातून पर्यावरण रक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



या उपक्रमात एकूण
१०० झाडे लावण्यात आली. यामध्ये बहाडोली जांभूळ, करंज, राणआवळा, खाया, गुलमोहर आणि अन्य प्रजातींचा समावेश होता. लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाभोवती प्लास्टिक व बांबूच्या कुंपणाने संरक्षक चौकट उभारण्यात आली. विशेष म्हणजे, या झाडांच्या संगोपनासाठी गावातील तरुण व ग्रामस्थांना प्रत्येकी तीन झाडे दत्तक देण्यात आली, ज्यामुळे वृक्षसंवर्धनाची जबाबदारी गावकऱ्यांनी आपली मानली आहे. पुढील वर्षी सर्वाधिक झाडे जगवणाऱ्या सहभाग्याला सन्मान व बक्षीस दिले जाणार आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज राऊत (कोकण विभाग संघटक व लोकमत मुंबई आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईकग्रामपंचायत पथराळीच्या सरपंच सौ. पिंकी प्रणय संखे यांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन संजय घरत यांनी तर प्रस्तावना खजिनदार सुशांत संखे यांनी सादर केली. अध्यक्ष जगदीश करोतिया यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


या वेळी शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चूरी, लोकमतचे पत्रकार निरज राऊत, एमआयडीसी अभियंता अमोल सानप, जिंदाल कंपनीचे राहुल पांडे, अॅड. ठाकूर प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीच्या अध्यक्ष जगदीश करोतिया, उपाध्यक्ष रियाज मुल्ला, सल्लागार विजय बोपर्डीकर, सचिव संतोष घरत, खजिनदार सुशांत संखे, सहसचिव स्वप्नील पिंपळे, प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम, सदस्य ए. के. पांडे, जी. के. पांडे, शादिक शेख, सुनील मराठे व प्रशांत करोतिया यांनी संयुक्तरित्या केले. या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 


◾ यावेळी बोलताना सरपंच पिंकी संखे यांनी, "पथराळी गाव अणुऊर्जा प्रकल्पाच्या हाकेच्या अंतरावर असूनही, त्या प्रकल्पाकडून सामाजिक उत्तरदायित्वाचे पालन केले जात नाही, याची खंत वाटते," असे ठाम मत व्यक्त केले.


◾ "वृक्षारोपण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विदर्भ व मराठवाड्यात काम करत असताना वृक्षांचे खरे महत्त्व मला जाणवले. दोन वर्षे काम करूनही लांबवर झाडे दिसत नव्हती. त्यामुळे मी शिक्षक, पत्रकार, तरंग वर्गातील बंधूंना सोबत घेऊन वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला. आम्ही केवळ झाडे लावली नाहीत, तर वर्षभर त्यांचे जतन केले, त्यांना जगवले. सकाळी सहा वाजता उठून विभागनिहाय झाडांना टॅंकरने पाणी घालायचो. झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, पण ती जगवणे ही खरी जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्षारोपणानंतर वृक्षसंवर्धनाशी नाते जोडणे हे अधिक गरजेचे आहे," असे प्रतिपादन बोईसर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी केले.


◾ "वृक्ष म्हणजे जीवन आहे, 'वृक्ष वाचवा – जीवन वाचवा' ही केवळ घोषणा नसून आजच्या काळात ती जीवनाची खरी गरज बनली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून, प्रत्येकाने वृक्षसंवर्धन हे आपले कर्तव्य मानले पाहिजे."

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज राऊत यांनी सांगितले


◾ शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, की “आज काँक्रीटच्या जंगलात हिरवळीचा एक श्वास मिळवण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज आहेत. फक्त झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन ही खरी जबाबदारी आहे.”


या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणप्रेम आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, हे अभियान इतर गावांसाठीही प्रेरणास्थान ठरले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक