यशवंत सृष्टीतील अनियमित बांधकामांचा पर्दाफाश; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश

यशवंत सृष्टीतील अनियमित बांधकामांचा पर्दाफाश; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश

नागरिकांची फसवणूक, नियमांची उधळण – यशवंत सृष्टी बिल्डरवर कारवाईची तलवार




बोईसर : खैरा पाडा येथील स.क्र. १८४० वर उभारण्यात आलेल्या यशवंत सृष्टी गृहसंकुलात नागरी सुविधांचा अभाव असून, बिल्डरने मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत संखे यांनी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार सादर केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने याची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत.


यशवंत सृष्टीमध्ये मंजूर आराखड्यानुसार गार्डन, रस्ते, ओपन स्पेस, बफर लाईन आदी बाबी दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध नसून, नियोजनाच्या नावाखाली अनेक अनियमितता करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अमेनिटी स्पेसमध्ये खासगी शाळा व महाविद्यालय उभारण्यात आले असून, ओपन स्पेसमध्ये इलेक्ट्रिकल सबस्टेशन, पाण्याच्या टाक्या व इतर बांधकामे करण्यात आली आहेत. यामुळे संपूर्ण आराखड्याला हरताळ फासल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


रहिवाशांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने यामध्ये त्वरित कारवाई करत नगररचना विभाग, तहसील कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत स्थळ पाहणी करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


बिल्डरच्या बेकायदेशीर कृतीमुळे नागरिकांच्या मुलभूत सुविधांचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक