आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिनानिमित्त नवापूर येथील जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळेत जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिनानिमित्त नवापूर येथील जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळेत जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

बोईसर : "आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिवस"निमित्त जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा, नवापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांच्या सहभागातून अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण रक्षणाविषयी माहिती देणाऱ्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी “प्लास्टिकमुक्त पृथ्वी” या संकल्पनेवर आधारित चित्रं रेखाटली. या चित्रांमधून त्यांनी प्लास्टिकचा अपाय, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय अत्यंत प्रभावीपणे मांडले.

सदर उपक्रमात पालकांनीही हजेरी लावून मुलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रांमधून प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गावर होणारे परिणाम ठळकपणे व्यक्त झाले.


कार्यक्रमात शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती शितल संखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “प्लास्टिक ब्रिक्स” संकल्पनेची माहिती दिली. त्यांनी दाखवून दिले की, घरगुती वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करून ते विटा तयार करण्यासाठी कसे वापरता येऊ शकते. यामुळे प्लास्टिकचा अपायकारक कचरा कमी करता येतो व तो पर्यावरणपूरक उपाय ठरतो.


तसेच पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर भर देत उपस्थित विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी एकत्र येऊन “प्लास्टिक वापर टाळूया, पर्यावरण वाचवूया” असा संदेश देणारी प्रतिज्ञा घेतली.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, त्यांच्या बालमनात सेंद्रिय जीवनशैलीचा बीजारोपण झाला आहे. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी शिक्षकवृंदांचे कौतुक केले.


हा उपक्रम भविष्यातही नियमित स्वरूपात राबवण्यात यावा, अशी अपेक्षा पालकवर्ग व ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू