वाड्यातील दरोडा प्रकरण उघडकीस; सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पालघर पोलिसांची दमदार कामगिरी

वाड्यातील दरोडा प्रकरण उघडकीस; सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पालघर पोलिसांची दमदार कामगिरी

पालघर – वाडा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे झालेल्या दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा पालघरच्या विशेष पथकाने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. ही कारवाई पालघर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली असून नागरिकांत समाधानाची लाट पसरली आहे.

२४ जून २०२५ रोजी मध्यरात्री ब्राम्हणगाव येथील ८७ वर्षीय तुकाराम पाटील यांच्या घरी अनोळखी दरोडेखोरांनी मागच्या पडवीतून प्रवेश करून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात घुसत पाटील दाम्पत्याचे हातपाय बांधले व तोंडाला चिकटपट्टी लावून घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि सततच्या शोधाशोधीच्या आधारावर वाडा, भिवंडी, पडघा परिसरात छापे टाकून एकूण ६ संशयित आरोपींना अटक केली.


अटक करण्यात आलेले आरोपी: १. वैभव दिलीप संगारे (३४, भिवंडी) २. विनोद नामदेव पाटील (३१, भिवंडी) ३. भुषण दिपक धुमाळ (३७, कल्याण) ४. सनी साईनाथ पष्टे (२१, भिवंडी) ५. प्रतीक अरुण पष्टे (२३, भिवंडी) ६. महेश रमेश जाधव (२०, वाडा)


सदर आरोपींना ३ जुलै रोजी अटक करण्यात आली असून ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तपासात निष्पन्न झाले की, यातील काही आरोपींविरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली व्हॅग्नर कार, हत्यारे व सहा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.


सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक  विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, गणपतराव पिंगळे यांचे मार्गदर्शनानुसार पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर, पोनि/दत्तात्रय किंद्रे, नेम. वाडा पोलीस ठाणे, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि/रविंद्र वानखेडे, पोउनि गोरखनाथ राठोड, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोअमं/नरेंद पाटील, पोअमं/विशाल कडव, पोअमं/महेश अवतार, नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच म. पोउनि/रुपाली गुंड, पोअमं/रोहीत तोरस्कर, म.पोअमं/स्नेहल शेलार नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक