शिबिरातील गैरहजेरीचा फटका : डॉ. कृणाल सोनावणे यांची सेवा समाप्त
शिबिरातील गैरहजेरीचा फटका : डॉ. कृणाल सोनावणे यांची सेवा समाप्त
गर्भवती महिलांच्या आरोग्य शिबिरात अनुपस्थितीमुळे कडक कारवाई
सरावली, ता. डहाणू – गरोदर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या आरोग्य तपासणी शिबिरात भरारी पथकातील डॉक्टर डॉ. कृणाल सोनावणे यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज रानडे यांनी तातडीने आदेश देत डॉ. सोनावणे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
सदर शिबिरात अनुपस्थित राहिल्याच्या प्रकाराची माहिती माध्यमांतून समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला. या प्रकरणाची चौकशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी सखोल तपास करून आपला अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्याकडे सुपूर्त केला.
अहवालात डॉ. सोनावणे यांची सेवा कसूर स्पष्ट झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने कोणतीही ढिलाई न करता तात्काळ सेवा समाप्तीचा निर्णय लागू केला. ही कारवाई आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्वाची आणि शिस्तबद्धतेची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे.
Comments
Post a Comment