मुकेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम
मुकेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम
बोईसर – “वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा दिवस न राहता, तो इतरांच्या आयुष्यात काही सकारात्मक घडवण्याची संधी असू शकतो,” हे माजी शिवसेना बोईसर शहरप्रमुख आणि माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
दि. ९ जुलै रोजी त्यांनी आपला वाढदिवस पारंपरिक पद्धतीने न साजरा करता, शिक्षणासाठी गरज असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून समाजभान जोपासले. या उपक्रमात धोडीपूजा जिल्हा परिषद शाळा, भैय्यापाडा मदरसा, सरावली जिल्हा परिषद शाळा आणि प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, अवध नगर येथील विद्यार्थ्यांना वह्या, छत्र्या, पेन व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांमध्ये थोडा दिलासा मिळाला आणि त्यांच्या पालकांनाही आर्थिकदृष्ट्या थोडा हातभार लागला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधून "शिक्षण हेच खरे शस्त्र असून, आत्मविश्वासाने पुढे जात राहा," असा प्रेरणादायी संदेशही देण्यात आला.
या उपक्रमाला शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रभाकर राऊळ, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख निलम संखे, बोईसर शहरप्रमुख अतुल देसाई, तसेच ग्रामपंचायत सदस्य अजय ठाकूर, रफिक शेख, अमित गव्हाणे, मुसा अमोल मंडळ, सुशील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मुकेश पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रकर्षाने जाणीव झाली. एकीकडे गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले गेले, तर दुसरीकडे वाढदिवसासारखा वैयक्तिक दिवस समाजासाठी उपयोगी कसा ठरवता येतो, याचे वास्तव उदाहरण समाजासमोर ठेवले गेले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments
Post a Comment