बनावट IAS अधिकारी बनून १५ एकर जमिनीची फसवणूक

बनावट IAS अधिकारी बनून १५ एकर जमिनीची फसवणूक

मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बनावट IAS अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल


पालघर : पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे बनावट IAS अधिकारी असल्याचे भासवून तब्बल १५ एकर जमिनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रतिक मोहन पाटील (रा. कल्पतरु बिल्डिंग, मधुवन सोसायटी, उंबरपाडा, सफाळे) याच्याविरोधात मंडळ अधिकारी तेजल रघुनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही घटना दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सुमारे दुपारी १२ वाजता मंडळ अधिकारी कार्यालय, सफाळे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक पाटील याने स्वतः IAS अधिकारी असून सिमला कॅडरमध्ये कार्यरत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने मौजे कर्दळ, ता. पालघर येथील एकूण सुमारे १५ एकर क्षेत्र असलेल्या जमिनीसंदर्भातील खरेदी दस्त व भाडेपट्टा करारात खोट्या सह्या व बनावट आधारकार्डाचा वापर केला.


या जमिनींचे मूळ मालक – १) मयत श्रीमती आशालता दत्तात्रय ताम्हणकर व २) श्री. जयंत विष्णू दांडेकर – यांच्या नावाने खोटे कागदपत्र तयार करून ICICI बँकेसोबत भाडेपट्टा करार करण्यात आला होता. सदर जमिनीची खरेदी दस्त नोंद ९२१/२०२३ अन्वये ६ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली होती. ही कागदपत्रे पूर्णतः बनावट असून त्याद्वारे शासनाची व मूळ मालकांची फसवणूक करण्यात आली.


सदर गुन्हा दि. ८ मे २०२५ रोजी नोंदवण्यात आला असून, आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २०४, ३३६(२), ३३६(३), ३४०(१), ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पालघर पोलीस करत असून अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक